शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

ब्रिटिशकाळापासून संतसाहित्याची पीछेहाट

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

सदानंद मोरे : जिल्हा वारकरी समितीतर्फे सत्कारप्रसंगी प्रतिपादन

सदानंद मोरे : जिल्हा वारकरी समितीतर्फे सत्कारप्रसंगी प्रतिपादन
नाशिक : मराठी साहित्याचा पाया असणार्‍या संत साहित्याला ब्रिटिश काळापासून वाईट दिवस आले. तत्पूर्वी ज्ञानदेवांपासून ते निळूबारायांपर्यंत सर्वच संतांनी जगण्याविषयीचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मांडले होते. ते घराघरात पोहोचले होते, परंतु ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू झाल्याने संतसाहित्याची पीछेहाट झाल्याचे मत ८८व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाशिक जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मीचंद्र शेंडे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सभापती नितीन ठाकरे, केशव पाटील, त्र्यंबक गायकवाड आदि उपस्थित होते. ते म्हणाले संतसाहित्य मराठी साहित्याचा पाया आहे. वर्तमानकाळाचा अभ्यास करून अध्यात्माद्वारे त्यावर मार्गदर्शन करण्याचे काम संतांनी केले. राज्याची संस्कृती व्यापक आहे, तिची जडणघडणही संतांनीच केली. संतांनी त्यांच्या काळात साहित्यातून वर्तमानकाळातील परिस्थितीवर प्रहार केले. संत निवृत्तिनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत सर्वांनीच साहित्य घराघरांत पोहोचविले.
१३व्या शतकात स्थापन झालेल्या भागवत धर्माने जाती पाती तोडत नव्या धर्माची स्थापना केली. त्यात अनेक पंथांच्या आणि धर्माच्या लोकांनी त्यात प्रवेश केला. त्यानंतर भेदभावाची तीव्रता कमी झाली होती, संतसाहित्याच्या विचारांची ती क्रांती होती. त्यानंतर पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचा विस्तार झाल्यानंतर संतसाहित्यावर आधारितच लावण्या तयार होऊ लागल्या. तोपर्यंत संतसाहित्य घराघरात होते. परंतु त्यानंतर इंगजांबरोबर आलेल्या त्यांच्या साहित्याचे अनुकरण मराठी साहित्यात होऊ लागल्याने तेव्हापासूनच संतसाहित्याकडे दुर्लक्ष झाल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.
त्यानंतरही स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची आरती, प्रार्थना समाजाची तत्त्वे यांच्यामध्येही संतसाहित्याचाच वारसा दिसून आला. त्यामुळे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकावर संतसाहित्याचेच संस्कार होत असतात, असे माझे मत असल्याचेही ते म्हणाले. मी संतसाहित्याबरोबरच आधुनिक साहित्याचाही लेखक आहे. त्यामुळे संतसाहित्यिकाच्या दृष्टीतून आधुनिक पद्धतीचे लिखाण करताना मी दोन्हीकडे समतोल साधतो असेही ते म्हणाले. प्रारंभी दामोदर गावले यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी परिचय करून दिला. वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मारुतीबुवा कुर्‍हेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. विनायकदादा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

अत्रेंच्या शाबासकीने लिहिता झालो
वयाच्या अकराव्या वर्षी मी तुकोबारायांवर पहिला लेख लिहिला होता. तो छापून यावा, अशी माझी इच्छा होती. त्यानुसार मी तो लेख अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्रात पाठविला होता. अत्रेंनी तो लेख तर छापलाच, परंतु मला शाबासकी देत लिखाण करीत राहा असा सल्ला दिली. त्यामुळेच मी लिहिता झालो, असे मोरे म्हणाले.

माझ्यावर जास्त जबाबदारी
नाशिकमध्ये झालेल्या वारकरी संप्रदायाच्या साहित्य संमेलनामुळेच माझ्यावर आज मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे, असे मी समजतो. वारकरी समाजाचा असल्याने इतर अध्यक्षांपेक्षा माझ्याकडून साहित्यिकांसह वाचकांनाही जास्त अपेक्षा आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर असल्याचे मी समजतो.