शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प.बंगालमधील जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात

By admin | Updated: July 10, 2017 13:06 IST

फेसबूकवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने बदुरिया आणि नॉर्थ 24 परगणाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 10-  फेसबूकवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने बदुरिया आणि  नॉर्थ 24 परगणाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पण आता ही तणावसदृश्य परिस्थिती निवळायला सुरूवात झाली आहे. पण तेथिल इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे. फेसबूक पोस्टमुळे भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी सकाळपासून दुकानं, बाजार आणि व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत.  लोकांनी घराच्या बाहेर पडायला सुरूवात केली असून जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरात कुठल्याही प्रकारच्या हिंसेची घटना घडलेली नाही.   

परिसरात गस्त घालण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. इथे परिस्थिती आता सुधारते आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती राज्याच्या गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 
 
आणखी वाचा
 

मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार, फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती

 

बजरंगी भाईजानच्या अभिनेत्रीला दोन वर्षाचा कारावास

 

एअरपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणी "चक दे" फेम नेगी होणार निलंबित?

 
 
काय आहे प्रकरण -
 
एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबूवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता. हा विद्यार्थी बदुरिया येथील राहणार आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जीना याप्रकऱणी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली असून केंद्राने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सुरक्षेसाठी पाठवलं आहे. नॉर्थ 24 परगणा येथील ही घटना आहे.
 
ममता बॅनर्जी यांनी केंद्राला फटकारले -
 
बशीरहाट व बदुरिया येथील वातावरण बिघडविण्यास आणि तिथे धार्मिक विद्वेष निर्माण करण्यास काही संघटना जबाबदार आहेत, असे सांगून, त्यांनी त्याबद्दलही नाव न घेता भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या, दोन धार्मिक संघटनांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बशीरहाट व बदुरिया येथील दंगलींची न्यायालयीन चौकशी केली जाईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यात केंद्र सरकार आम्हाला मदत करीत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
 
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपा नेत्याची मागणी -
 
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाच्या राज्य शाखेने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आम्ही राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि राज्यातील गंभीर स्थितीसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले.
दंगलग्रस्त भागातील लोकांना भरपाई देण्याची मागणीही भाजपाने केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही, हा ममता बॅनर्जी यांचा आरोपही घोष यांनी फेटाळून लावला.