शहरं
Join us  
Trending Stories
1
जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
"तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय"; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला
4
Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन
5
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
6
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
7
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
8
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
9
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
10
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
11
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
12
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
13
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
14
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
15
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
16
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
17
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
18
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
19
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
20
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

गोमांस खाणाऱ्यांनो पाकमध्ये चालते व्हा!

By admin | Updated: May 23, 2015 00:09 IST

ज्यांना गोमांस खाण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी पाकिस्तानात चालते व्हावे

नवी दिल्ली : ज्यांना गोमांस खाण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असे ठणकावत केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी गुरुवारी गोवंश हत्याबंदीचे प्रभावीपणे समर्थन केले. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नक्वींचे वक्तव्य असमर्थनीय असल्याचे स्पष्ट केले.‘हा नफा आणि तोट्याचा प्रश्न नसून, श्रद्धा व आस्थेचा मुद्दा आहे. हा हिंदूंसाठी अतिशय संवेदनशील असा मुद्दा आहे,’ असे नकवी म्हणाले. एका वृत्त वाहिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘गोमांस न खाल्ल्यामुळे जर कुणी मरत असतील तर ते पाकिस्तान वा अरब देशांत किंवा जगाच्या पाठीवर ज्या देशांत गोमांस उपलब्ध आहे, त्या कोणत्याही देशांत जाऊ शकतात,’ असे नकवी यांनी स्पष्ट केले.मुस्लिमांचाही गोमांस खाण्याला विरोध असल्याचा दावा नकवी यांनी केला. यावेळी नकवी यांच्या समोर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी बसले होते.

‘एक हिंदू म्हणून मी गोमांस खाल्ले आहे व यापुढेही गोमांस खाणार आहे,’ असे निक्षून सांगत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी नकवी यांच्यावर उपरोधिक टीकास्त्र सोडले. जगातील ९० टक्के लोक गोमांस खातात. मग ते सर्व पापी आहेत काय? असा सवाल त्यांनी केला.