शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षीमित्रासोबतच निसर्गमित्र व्हा पक्षीमित्र संमेलनात सूर : रेस्क्यू हाऊसची गरज; खुल्या सत्रा दरम्यान व्यक्त केली भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:12 IST

पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पक्ष्यांचा इतिहास व संवर्धन यासह विविध महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.

जळगाव : उत्तर महाराष्ट्रस्तरीय पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पक्ष्यांचा इतिहास व संवर्धन यासह विविध महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. पक्षी वाचविण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ पक्षीमित्र राहून चालणार नाही तर निसर्गमित्र व्हावे अशी अपेक्षा संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी आयोजित केलेल्या खुल्या सत्रादरम्यान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.सातपुडा बचाव कृती समितीतर्फे वाघूर परिसरात दोन दिवसीय संमेलनात दुपारी १२ वाजता खुले सत्र घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष अभय उजागरे, संयोजक राजेंद्र नन्नवरे, डॉ.सुधाकर कुर्‍हाडे उपस्थित होते.माकडांचाउपद्रवथांबविण्यासाठीवृक्षतोडदत्तात्रय तावडे यांनी शेती शिवारातील पक्षांची स्थिती याबाबत आपले निरीक्षण नोंदविले. पूर्वी घनदाट जंगल होते. पाणी भरपूर होते. नंतर शेतीचा विकास झाला. विहिरीवर वीजपंप आले. पाण्याच्या प्रचंड उपशामुळे नदी व नाले आटले. त्यामुळे पक्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पूर्वी बैलाद्वारे शेती केली जात होती. त्यावेळी शेतात बांध होते. या बांधावर भरपूर झाडे असल्याने पक्ष्यांचा निवारा त्यावर होता. कालांतराने यांत्रिकीपद्धतीने शेती सुरु झाली. शेताचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांध गायब झाले. पर्यायाने त्यावरील वृक्षांची तोड झाली. पक्षांचा निवारा हिरावला गेला. शेतातील झाडे घरातील टेबल, खुर्ची, दरवाजा किंवा अन्य वस्तू तयार करण्यासाठी उपयोगात येतील यासाठी वाढवित होता. मात्र लाकडाच्या तुलनेत प्लास्टिक व लोखंडी वस्तू स्वस्त मिळत असल्याने शेतकरी शेतात झाडे ठेवत नाही. शेत आणि वनसंपदेवर पूर्वी शेतकरी सर्वांचा अधिकार मानत होता. त्यामुळे आता शेतात वारंवार येणारी माकडे थांबविण्यासाठी तो वृक्षतोड करीत असल्याचे त्यांनी सांगितले.पक्ष्यांसाठी रेस्क्यू होमची आवश्यकता राजेंद्र स्वामी यांनी संमेलनात पक्ष्यासंबधी माहिती देत असताना त्यांना रोपांचे वाटप केले जावे. जेणेकरून वृक्ष वाढतील आणि पक्षी वाढतील. पक्षीसंवधर्न करण्यासाठी पक्ष्यांसाठी रेस्क्यू होमची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष्यांची तोंडओळख व्हावी यासाठी तज्ज्ञांनी कार्यशाळा घेऊन माहितीचे आदानप्रदान करावे. त्या अनुशंगाने दुसरी साखळी तयार होईल.चिमण्या वाचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घरटे चातक संस्थेचे अनिल महाजन यांनी सद्यस्थितीला ग्रामीण व शहरी भागातील ८० टक्के चिमण्या या नष्ट झाल्या आहेत. चिमण्या वाचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घरटे त्यांनी तयार केले आहे. त्याबाबत माहिती दिली.