शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

निसर्गरम्य हर्सिल ५५ वर्षांनी पर्यटकांसाठी पुन्हा झाले खुले

By admin | Updated: July 16, 2017 01:54 IST

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून ८,६०० फूट उंचीवर वसलेल्या हर्सिल या गावाचे दरवाजे सरकारने ५५ वर्षांनंतर देशी-विदेशी पर्यटकांसाठी पुन्हा

डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून ८,६०० फूट उंचीवर वसलेल्या हर्सिल या गावाचे दरवाजे सरकारने ५५ वर्षांनंतर देशी-विदेशी पर्यटकांसाठी पुन्हा सताड खुले केले आहेत.चीनच्या सीमेपासून अवघ्या १०० किमी अंतरावर असलेले हर्सिल हे गाव सामरिकदृष्ट्या मोक्याचे असून १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारत सरकारने या गावात बाहेरच्या लोकांनी येण्यावर निर्बंध घातले होते. हर्सिलमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलाच्या अनेक छावण्या असल्याने भारतीय आणि विदेशी पर्यटकांना ‘इनर लाइन परमिट’ घेऊनच तेथे प्रवेश मिळू शकत होता. परदेशी नागरिकांना तर तेथे रात्रीचा मुक्काम करण्यासही मज्जाव होता. पर्यटनास चालना मिळून स्थानिक लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी हर्सिल ‘परमिटमुक्त’ करण्याची मागणी उत्तरकाशीवासीयांनी गेली अनेक वर्षे नेटाने लावून धरली होती. ती मान्य करून अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने यंदाच्या १८ जून पासून हर्सिलमधील प्रवेश व मुक्कामासाठी कोणत्याही प्रकारचे ‘परमिट’ लागणार नाही, असे जाहीर केले आहे. पर्यटक व ट्रेकर्ससाठी आनंदाची बातमी म्हणजे हर्सिलपासून ३० किमी अंतरावर असलले नेलाँग खोरेही खुले केले आहे. आतापर्यंत तेथे बाहेरच्या लोकांना जाण्यास मज्जाव होता. आता स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊन पर्यंटक तेथे जाऊ शकतील, अशी मुभा सरकारने दिली आहे. नेलाँग खोऱ्यापासून चीनची सीमा ६० किमी अंतरावर असून तेथेही भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या छावण्या आहेत. १९६२ च्या युद्धात नेलाँग खोरे व परिसरातील गावे खाली करून त्यांचे स्थलांतर अन्यत्र केले होते. उत्तराखंडचे चमोली अणि पिठोरगढ हे आणखी दोन जिल्हे चीनच्या सीमेला लागून आहेत व तेथे अजूनही ‘इनर परमिट’चे बंधन लागू आहे. (वृत्तसंस्था)१०० हिमशिखरे व हिरवेकंच जंगलहर्सिल हे त्याच नावाच्या खोऱ्यात वसलेले नितांतसुंदर व निसर्गरम्य असे गाव आहे.याच्या परिसरात हिमालयाची लहान-मोठी मिळून शंभर बर्फाच्छादित शिखरे आहेत. संपूर्ण खोऱ्यात नजर जाईल तिकडे देवदार वृक्षांचे घनदाट जंगल आहे व मानवी वस्त्यांच्या परिसरात सफरचंदांच्या हिरव्याकंच बागा आहेत.जेमतेम दोन हजार लोकवस्तीचे हर्सिल चारधाम यात्रेपैकी गंगोत्री या तीर्थक्षेत्राला जाण्याच्या वाटेवर आहे. दरवर्षी गंगोत्रीला जाणारे सुमारे दोन लाख यात्रेकरू व पर्यटक हर्सिलवरून पुढे जात असतात.हर्सिल खुले झाल्याने तेथे राहूनही गंगोत्रीची यात्रा करणे शक्य होईल. शिवाय २,३९० चौ किमी क्षेत्रावर पसरलेल्या गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाची सफरही येथे मुक्काम करून करता येईल.दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गंगोत्री देवस्थानाचे दरवाजे बंद झाले की, सहा महिने पूजा-अर्चा व आरती जेथे स्थलांतरित होते ते मुखबा हे गावही हर्सिलपासून दोन किमी अंतरावर आहे.