नातवाने टाकली वृध्देच्या डोक्यात बॅट
By admin | Updated: June 12, 2016 22:33 IST
जळगाव: माझ्या आधी आजीचे जेवण का बनविले? याचा आईला जाब विचारल्यानंतर नातवाने सुंदरबाई नवाल पुरोहीत (वय ८० रा.शिवाजी नगर, जळगाव) या वृध्देच्या डोक्यात बॅट मारुन जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी साडे चार वाजता घडली. सुंदरबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोक्यात तीन टाके घालण्यात आले आहेत. लहान नातुने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याआधीही मोठ्या नातूने त्यांना मारहाण केली होती.
नातवाने टाकली वृध्देच्या डोक्यात बॅट
जळगाव: माझ्या आधी आजीचे जेवण का बनविले? याचा आईला जाब विचारल्यानंतर नातवाने सुंदरबाई नवाल पुरोहीत (वय ८० रा.शिवाजी नगर, जळगाव) या वृध्देच्या डोक्यात बॅट मारुन जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी साडे चार वाजता घडली. सुंदरबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोक्यात तीन टाके घालण्यात आले आहेत. लहान नातुने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याआधीही मोठ्या नातूने त्यांना मारहाण केली होती. सोनाळा येथील पुरुषाची आत्महत्याजळगाव: सोनाळा ता.जामनेर येथील सुनील लोटू पाटील (वय ४२) यांनी रविवारी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.वीजेच्या धक्कयाने तरुण जखमीजळगाव: इलेक्ट्रीक काम करताना विजेचा धक्का बसल्याने सोपान वासुदेव पाटील (वय २९ र.नशिराबाद) हा तरुण जखमी झाला. रविवारी दुपारी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.तिघांना कुत्र्याचा चावाजळगाव: प्रथमेश पुरुषोत्तम साळुंखे (वय १३ रा.खोटेनगर), हौजाबी शेख मुख्तार (वय १२ रा.पाळधी, ता.धरणगाव) या दोन बालकांसह फिरोज रज्जाक तडवी (वय २९ रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या तिघांना कुत्र्याने चावा घेतल्याने रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.