नवी दिल्ली : भारताला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र करणा:या महात्मा गांधी यांचा पुतळा लंडनच्या संसद चौकात (पार्लमेंट स्क्वेअर) उभारण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या प्रारंभी या पुतळ्य़ाची उभारणी होईल.
ब्रिटिश परराष्ट्रमंत्री विल्यम हेग आणि अर्थमंत्री जॉर्ज ऑस्बर्न हे सध्या भारत दौ:यावर आहेत. जगाला अहिंसेद्वारे मानवी हक्क चळवळीची प्रेरणा देणा:या म. गांधी यांचा पुतळा उभारण्याची घोषणा त्यांनी येथे केली. सामाजिक शांतता आणि विभाजनाला विरोध याबाबतची गांधीजींची दृष्टी, भारताला प्रगतिपथावर नेण्याची त्यांची इच्छा आणि अहिंसेबद्दलची प्रतिबद्धता हा त्यांनी मागे ठेवलेला वारसा आजही समकालीन आहे जेवढा तो त्यांच्या जीवनकाळात होता. ते नेहमीच प्रेरणास्तंभ व ऊर्जास्नेत राहिले आहेत. इतर थोर नेत्यांसोबतच संसद चौकात म.गांधी यांचा पुतळा उभारून आम्ही त्यांचा गौरव करू, असे हग म्हणाले.
ओस्बर्न म्हणाले, भारतासारख्या सर्वात मोठय़ा लोकशाही देशाचे म. गांधी पिता आहेत. त्यामुळे संसदांची जननी असलेल्या ब्रिटिश संसदेसमोर गांधी यांना स्थान देण्याची हीच वेळ आहे. भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेला उद्देशून केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात म. गांधींच्या स्मृती जागवल्या. हे नवे स्मारक ब्रिटनमध्ये म.गांधींना श्रद्धांजली तसेच ब्रिटन आणि भारताच्या कायमस्वरूपी मैत्रीचे स्मारक ठरेल, असा आशावादही ओस्बर्न यांनी व्यक्त केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)