पार्किंगमधून हटणार बँक
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
- सूर्यनगरच्या तीनमजली इमारतीत अनधिकृत बांधकामनागपूर : कळमना मार्केट रोड सूर्यनगर येथील एका तीन मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम करून तेथे राष्ट्रीयकृत बँक सुरू आहे. संबंधित बँक त्वरित हटविण्याचे निर्देश नासुप्रने दिले आहेत.सूर्यनगर येथे खसरा क्र.१४-१५ वर प्लॉट नंबर १९१ वरील इमारत मालक डोगरमल शर्मा यांनी दोन ...
पार्किंगमधून हटणार बँक
- सूर्यनगरच्या तीनमजली इमारतीत अनधिकृत बांधकामनागपूर : कळमना मार्केट रोड सूर्यनगर येथील एका तीन मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम करून तेथे राष्ट्रीयकृत बँक सुरू आहे. संबंधित बँक त्वरित हटविण्याचे निर्देश नासुप्रने दिले आहेत.सूर्यनगर येथे खसरा क्र.१४-१५ वर प्लॉट नंबर १९१ वरील इमारत मालक डोगरमल शर्मा यांनी दोन मजली बांधकामासाठी परवानगी घेतली. यानंतर मंजूर नकाशाशिवाय तिसऱ्या माळ्यावर अतिरिक्त बांधकाम केले. याशिवाय तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम करून स्टेट बँक ऑफ बीकानेर ॲण्ड जयपूरला किरायाने दिले. तिसऱ्या माळ्यावर कमर्शिअल उपयोग केला जात होता. या अनधिकृत बांधकामासाठी २७ एप्रिल १९९६ रोजी इमारत मालकाला नासुप्रने नोटीस बजावली होती. त्यानंतर हे प्रकरण बरीच वर्षे न्यायालयात प्रलंबित राहिले. नासुप्र अधिकाऱ्यांनुसार न्यायालयाने इमारत मालकाची अपील रद्द केली. यानंतर नासुप्रचे अभियंता अविनाश भोगले, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक नितीन रहाटे, पथक प्रमुख वसंत कन्हेरे व चमूने गुरुवारी दुपारी संबंधित इमारतीचे निरीक्षण केले व पार्किंगच्या जागेवर सुरू असलेली बँक त्वरित हलविण्याचे निर्देश दिले. नासुप्रने इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्याची तयारी केली आहे.