शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात हिंदूंची 15 मंदिरं आणि 100 घरांची तोडफोड

By admin | Updated: November 1, 2016 10:50 IST

फेसबुकवर 'इस्लाम'बाबत कथित आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

ढाका, दि. 1 - बांगलादेशमधील हिंदू धर्मियांच्या जवळपास 15 मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकवर 'इस्लाम'बाबत कथित आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या बातमीमुळे ही तोडफोड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे येथील अल्पसंख्याकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, तोडफोड करणा-यांविरोधात प्रशासकीय अधिका-यांनी कायदेशीर कारवाई करत आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ब्राम्हणबाडिया जिल्ह्यातील नासिरनगरमध्ये रविवारी मंदिरांची तोडफोड करून हिंदू नागरिकांची 100 पेक्षा जास्त घरं लुटण्यात आली. यामुळे अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर माधबपूरमधील मंदिरांनाही टार्गेट करण्यात आले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काही मंदिरांच्या पुजा-यांना किरकोळ दुखापत झाली आहे. 
 
मंदिरांतील अधिका-यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे.  'एका हिंदू तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याने, मंदिरांच्या तोडफोडीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अशांतता पसरवल्याप्रकरणी संबंधित तरुणालाही अटक करण्यात आली आहे',अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.