शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूला जाणवणार 'नेलमॅन'ची पोकळी, वाचा कोण आहे हा 'नेलमॅन'

By admin | Updated: February 8, 2017 20:05 IST

बंगळुरूतील पंक्चर दुकानदार लवकरच सुटकेचा निःश्वास सोडतील, कारणंही तसंच आहे. बेनेडिक्ट जेबाकुमार हा व्यक्ती लवकरच बंगळुरू सोडणार आहे.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 8 - बंगळुरूतील पंक्चर दुकानदार लवकरच सुटकेचा निःश्वास सोडतील, कारणंही तसंच आहे. बेनेडिक्ट जेबाकुमार हा व्यक्ती लवकरच बंगळुरू सोडणार आहे. प्रश्न पडला असेल कोण आहे हा जेबाकुमार. जेबाकुमार यांना बंगळुरूच्या पंक्चर दुकानदारांचा कर्दनकाळ म्हटलं तर वावगं ठरू नये. 
 
लोकांच्या गाड्या पंक्चर व्हाव्यात म्हणून येथील पंक्चरवाले रस्त्यावर खिळे टाकायचे. धंदा जास्त व्हावा हा त्यामागचा उद्देश.  इंजिनीअर असलेले जेबाकुमार एक दिवस बानाशंकरी या त्यांच्या राहत्या घरून बेल्लांदूर येथे ऑफिसला जायला निघाले. वाटेत त्यांची गाडी पंक्चर झाली. रस्त्यात असलेल्या खिळ्यांमुळे गाडी पंक्चर झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण हे खिळे चुकून नाही तर जाणूनबुजून ठेवल्याचंही त्यांनी हेरलं. जाणूनबुजून रस्त्यावर खिळे टाकले जात असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी त्या रस्त्याने जाणं टाळलं. मात्र, नंतर याविरोधात लढण्याचं त्यांनी ठरवलं. पण लढणंही कसं? तर काहीसा गांधीगिरीचा मार्ग त्यांनी अवलंबला. म्हणजे तुम्ही खिळे टाकत राहा मी ते उचलत राहील असाच. 
 
रोज सकाळी ऑफिसला ते आपल्या सायकलवर निघायचे. सोबत एक काठी आणि काठीच्या टोकाला लोहचुंबक लावलेलं असायचं. त्या सहाय्याने वाटेत पडलेले खिळे उचलायला त्यांनी सुरुवात केली. गेल्या 5 वर्षांपासून ते हे काम करत आहेत. 
दोन वर्षांपूर्वी एका मित्राने खिळ्यांचा संग्रह करण्याचा आणि फेसबुकवर पेज बनवण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यानुसार त्यांनी खिळे जमवायला सुरुवात केली आणि फेसबुकवर 'माझा रस्ता, माझी जबाबदारी' (My road, my responsibility) असं एक पेज बनवलं. केवळ दोन वर्षांतच त्यांनी तब्बल 75 किलो खिळ्यांचा संग्रह केला आहे.
 
जेबाकुमार हे आता लवकरच बंगळुरू सोडणार आहेत. कारण त्यांच्या आवडीचं काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यासाठी चांगल्या पगाराची इंजिनीअरची नोकरी आणि कर्नाटक सोडून मूळ गाव असलेल्या तामिळनाडूमध्ये ते जाणार आहेत. तेथे जाऊन मत्स्य व्यवसाय ते करणार आहेत. मच्छीमारीचा व्यवसाय करणं ही त्यांची पहिली आवड होती. 
 
बंगळुरू सोडणार असल्याने येत्या शुक्रवारी त्यांनी संग्रहित केलेल्या खिळ्यांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. त्यामुळेच आता बंगळुरूमधील गाडीचालकांना जेबाकुमार या नेलमॅनची उणीव जाणवेल आणि तितकाच आनंद पंक्चर दुकानदारांनाही झाला असेल हे नक्की.