शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्यानंतर भावी नवरा-नवरीत होणाऱ्या गप्पांवर बंदी!; ‘या’ समाजाने काढला फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:32 IST

समाजातील कोणत्याही व्यक्तीने अन्य धर्म स्वीकारल्यास त्याच्याशी 'रोटी-बेटी'चे संबंध तोडले जातील, असा इशाराही सेन समाजाकडून नव्या फतव्यात देण्यात आला आहे.

बालोद : छत्तीसगडमधील सेन समाजाने साखरपुड्यानंतर लग्नापूर्वी तरुण-तरुणींमध्ये होणाऱ्या मोबाइल संवादावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. साखरपुड्यानंतर तुटणाऱ्या नात्यांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहून समाजाने हे पाऊल उचलले आहे. या नव्या नियमांनुसार, आता होणाऱ्या पती-पत्नीला एकमेकांशी फोनवर एकांतात बोलता येणार नाही; अत्यंत आवश्यक असल्यास त्यांना आपल्या पालकांसमोरच संवाद साधावा लागेल.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सेन समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष कौशिक आणि प्रदेश संघटन मंत्री गौरी शंकर श्रीवास यांच्या मते, साखरपुड्यानंतर भावी नवरा-नवरी तासनतास फोनवर बोलतात. या संवादादरम्यान अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात किंवा एकमेकांचे विचार न पटल्याने लग्न मोडण्यापर्यंत परिस्थिती जाते. सध्या बालोद जिल्ह्यात लागू असलेला हा नियम लवकरच संपूर्ण प्रदेशात लागू केला जाण्याची शक्यता आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीने अन्य धर्म स्वीकारल्यास त्याच्याशी 'रोटी-बेटी'चे संबंध तोडले जातील, असा इशाराही सेन समाजाकडून नव्या फतव्यात देण्यात आला आहे.

बूट लपवण्याच्या प्रथेलाही फाटा, आणखीही निर्बंध

मोबाइलच नव्हे, तर लग्नात मेहुणीद्वारे नवऱ्या मुलाचे बूट लपवण्याची प्रथा आता बंद करण्यात आली आहे. कारण यामुळे दोन्ही पक्षांत वादाची स्थिती निर्माण होते. साखरपुड्याच्या कार्यक्रमात केवळ १५ ते २० लोकांनाच नेण्याची परवानगी असेल.

नव्या पिढीमध्ये मतमतांतरे 

समाजातील काहींनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, काही तरुणांनी याला वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा असल्याचे म्हटले आहे. आयुष्यभर सोबत राहणाऱ्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक आहे, असे मत या गटाने मांडले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sen community bans pre-wedding phone calls to prevent breakups.

Web Summary : Chhattisgarh's Sen community prohibits engaged couples from private phone conversations, requiring parental supervision due to increasing relationship breakups. Other restrictions include banning the groom's shoe-hiding tradition and limiting engagement attendees. While some support the decision, others view it as infringing on personal freedom.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल