शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादविरोधी मोहीमेच्या थेट प्रक्षेपणावर बंदी ?

By admin | Updated: January 1, 2015 11:01 IST

दहशतवादी हल्ल्यांच्यावेळी सुरक्षा दलांच्या मोहीमेचे थेट प्रक्षेपण करण्यास बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरु केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १ - दहशतवादी हल्ल्याच्यावेळी सुरक्षा दलांच्या मोहीमेचे थेट प्रक्षेपण करण्यास बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरु केल्या आहेत. गृहमंत्रालयाने माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवून कॅबल टेलिव्हीजन नेटवर्क रुल्समध्ये दुरुस्ती करण्याची सुचना केली आहे. 
 
२६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी प्रसारमाध्यमांनी सैन्याच्या कारवाईचे थेट प्रक्षेपण दाखवले होते व याचा फायदा पाकमध्ये बसलेल्या सूत्रधारांना होत होता. थेट प्रक्षेपणामुळे मोहीमेतील गोपनीय माहिती उघड होते. तसेच सुरक्षा दलातील जवान, सामान्य नागरिक आणि पत्रकार यांच्या जीवालाही धोका असतो असे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. युपीए सरकारच्या काळातही लष्करी मोहीमांच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरु होते. तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्र्यांनी यांसंदर्भात विधेयकही तयार केले होते. मात्र त्यावर अंतिम निर्णय झाला नव्हता. आता केंद्रातील मोदी सरकारने लष्करी मोहीमांचे थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे.