शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जवानांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी - गृहमंत्रालयाचे निर्बंध

By admin | Updated: January 14, 2017 12:13 IST

बीएसएफ, सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी व्हिडीओ पोस्ट करून वरिष्ठ अधिका-यांच्या छळाला वाचा फोडल्याने गृह मंत्रालयाने सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध लादले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - बीएसएफ, सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी व्हिडीओ पोस्ट करून वरिष्ठ अधिका-यांच्या छळाला वाचा फोडल्याने, देशभरात संतापाचे वातावरण आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांना मिळणा-या वागणुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून टीकाही करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे जवांनाच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ' पॅरामिलिट्री फोर्समधील जवानांना परवानगीशिवाय सोशल मीडिया वापरता येणार नाही' असे आदेश गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत.  बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांचे व्हिडिओ लागोपाठ समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सावध पवित्रा घेतला आहे.
त्यामुळे यापुढे पॅरामिलिट्री फोर्समधील जवानांना ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासारख्या सोशल मीडियांचा वापर संमतीशिवाय करता येईल. तसेच कुठलेही वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओही त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाहीत. जवानांना सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकायची असेल तर त्यापूर्वी त्यांना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे, आदेश गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत. 
(सैन्यातही अन्यायाची खदखद)
(तक्रारी असल्यास थेट माझ्याकडे या - लष्करप्रमुख) 
 
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जवानांकडे स्मार्टफोन आले असून बरेच जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ही सवय कमी करण्यासाठी कडक शिस्तीचं पालन करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले.
 
लष्करात स्मार्टफोन वापराला बंदी नाही - लष्करप्रमुख
दरम्यान या सर्व प्रकरणावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्टीकरण दिले असून लष्करात स्मार्टफोनवर बंदी नसल्याचेही स्पष्ट केले.