शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

आरोग्य संस्थेला विदेशी निधी घेण्यास बंदी

By admin | Updated: April 21, 2017 02:08 IST

कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गृह मंत्रालयाने दिल्लीतील द पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडिया (पीएचएफआय) या संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे.

नवी दिल्ली : कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गृह मंत्रालयाने दिल्लीतील द पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडिया (पीएचएफआय) या संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे. त्यामुळे या संस्थेला आता विदेशी निधी स्वीकारता येणार नाही. पीएचएफआयला आता बिल अ‍ॅण्ड मिलिंदा गेटस फाऊंडेशन वा अन्य संस्थांकडून निधी स्वीकारता येणार नाही. या संस्थेने आॅगस्ट २०१६ मध्ये एफसीआरएनुसार पाच वर्षांसाठी परवाना घेतला होता. के. श्रीनाथ रेड्डी हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. २००६ मध्ये तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले होते. एचआयव्हीविरुद्धचा लढा, तंबाखू नियंत्रण, पर्यावरण संरक्षण आदी क्षेत्रांत ही संस्था काम करते. आरएसएस समर्थित स्वदेशी जागरण मंचने असा आरोप केला होता की, गेटस फाऊंडेशन आणि मोठ्या फार्मा कंपन्या यांचा थेट संबंध असून, आरोग्याच्या धोरणावरही त्यांचा प्रभाव होता. संघटनेच्या सहसंयोजक अश्विनी महाजन म्हणाले की, हा मुद्दा आम्ही आरोग्यमंत्र्यांकडे मांडला होता.‘द पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडिया’ने बँकेत खाते उघडले होते. त्याची माहितीही संबंधित मंत्रालयाला देण्यात आली नव्हती. गृहमंत्रालयाला माहिती न देता या संस्थेतर्फे काही रक्कम परदेशात पाठविण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, पीएचएफआयच्या वतीने सांगण्यात आले की, गृह मंत्रालयाकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत संस्था स्पष्टीकरण देईल. मे २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर एनडीए सरकारने २० हजार एनजीओंचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)