शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

सर्व प्रकारच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर बंदी घाला

By admin | Updated: July 27, 2016 05:00 IST

चेहऱ्याचा रंग उजळवण्याची जाहिरात करणाऱ्या सर्वच फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी मंगळवारी राज्यसभेत करण्यात आली. पक्षभेद विसरून सर्वच संसद सदस्यांनी

नवी दिल्ली : चेहऱ्याचा रंग उजळवण्याची जाहिरात करणाऱ्या सर्वच फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी मंगळवारी राज्यसभेत करण्यात आली. पक्षभेद विसरून सर्वच संसद सदस्यांनी फेअरनेस क्रीमसारखी उत्पादने आणि त्यांच्या जाहिराती महिलांसाठी मानहानीकारक असल्याची जोरदार तक्रार सभागृहात केली. काँग्रेसचे सदस्य विप्लव ठाकूर यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, फेअर अ‍ॅण्ड लव्हली आणि पॉण्ड्स फेसक्रीम यासारख्या उत्पादनांच्या जाहिराती महिलांसाठी मानहानीकारक आहेत. प्रत्येक क्रीम महिलांचा रंग उजळविण्याचा दावा करते. तथापि, या दाव्याची कधीही शहानिशा झालेली नाही. या जाहिरातींमुळे महिलांमध्ये न्यूनगंड तयार होत असल्याने त्या बंद करण्यात याव्यात आणि अशा क्रीम्सवर बंदी घालावी, असे त्या म्हणाल्या. ही उत्पादने बाजारात येण्यापूर्वी संबंधित संस्थांनी त्यांची तपासणी केली होती काय, अशा सवालही त्यांनी केला. या जाहिरातींमधून खोटे दावे केले जात असल्याची सरकारने दखल घ्यावी, असे ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्याला सर्वांचा पाठिंबा होता. फेन्सीडिल, कोरेक्स यासारख्या ब्रॅण्ड्ससह ४३९ औषधांच्या विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली असली तरी न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे यातील काही औषधे आजही बाजारात उपलब्ध आहेत, असे खते आणि रसायने मंत्री अनंत कुमार यांनी स्पष्ट केले. औषधांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर बंदीचा निर्णय घेण्यात आला. बंदी घातलेल्या ४३९ औषधांपैकी ३४४ औषधे निश्चित मात्रेच्या संयोगाची आहेत. यातील अनेक औषध उत्पादकांनी विविध उच्च न्यायालयांत धाव घेऊन बंदीवर स्थगिती आदेश मिळवला आहे. या औषधांवरील बंदीची शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी करता यावी यासाठी सरकार प्रयत्नशील असून न्यायालयाची स्थगिती उठविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे मंत्र्यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितले. औषधांच्या नमुन्यांची तपासणी करणारी केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संघटना स्वतंत्रपणे काम करते ती इतर कोणत्याही देशांतील नियामकांच्या शिफारशींचे अनुसरण करीत नाही. ही संघटना म्हणजे नियामक असून औषधांची तपासणी करणारे आमचे तज्ज्ञ आहेत, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)लोकप्रिय भारतीय ब्रॅण्ड्सची चीनमध्ये बेकायदा नक्कलभारतात उत्पादित होणाऱ्या अनेक लोकप्रिय उत्पादनांची हुबेहूब नक्कल करून ती नकली उत्पादने चीनच्या बाजारपेठांमध्ये विकली जात असल्याच्या घटना भारताच्या बीजिंग येथील वकिलातीच्या निदर्शनास आल्या आहेत. संबंधित कंपन्यांनी त्यांच्या कॉपीराइट/ट्रेडमार्कचा भंग झाल्याबद्दल औपचारिक तक्रारी केल्यानंतर भारतीय वकिलात या प्रकरणांचा पाठपुरावा चीनमधील सुयोग्य अधिकाऱ्यांकडे करीत आहे, अशी माहिती वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली.