शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बहादूर ‘मानसी’चे देशासाठी बलिदान

By admin | Updated: August 11, 2015 02:47 IST

देशासाठी बलिदान देण्याचा प्रसंग आला तेव्हा ‘मानसी’ मागे हटली नाही. आणि तिने उत्तर जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमधील मोहिमेत दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना आपले

श्रीनगर : देशासाठी बलिदान देण्याचा प्रसंग आला तेव्हा ‘मानसी’ मागे हटली नाही. आणि तिने उत्तर जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमधील मोहिमेत दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना आपले जीवन देशासाठी समर्पित केले.‘मानसी’ ही चार वर्षांची एक लॅब्रोडोर श्वान होती. आणि तिची देखभाल करणारा बशीर अहमद वार प्रादेशिक सेनेतील जवान होता. दोघेही येथून १५० कि.मी. अंतरावरील तंगधारमध्ये सीमेपलीकडून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबाराचे लक्ष्य ठरले. या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मानसी आणि वार दोघेही कुपवाडाचे राहणारे होते. घनदाट जंगलात त्यांची तैनाती करण्यात आली होती. शनिवार आणि रविवारदरम्यानच्या रात्री दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मिरातून या भागात घुसखोरी केली होती. लष्कराच्या श्वान पथकाची सदस्य असलेल्या मानसीला शत्रूच्या हालचालींची चाहूल लागली होती. ती बशीर अहमद वार यांना त्या दिशेने घेऊन गेली. मानसीने घुसखोरांवर भुंकणे सुरू करताच त्यांनी तिला गोळ्या घातल्या. तिची देखभाल करणाऱ्या जवानाने सुरक्षा दलाला बोलावण्यासोबतच घुसखोरांसोबत संघर्ष सुरू ठेवला. त्यांना आपल्या प्रिय मित्राच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. शेवटी मृत्यूही या दोघांना विभक्त करू शकला नाही. वारही शत्रूसोबतच्या लढ्यात शहीद झाले. (वृत्तसंस्था)युद्धाच्या मैदानात श्वान जखमी झाला, तर एखाद्या जवानाप्रमाणेच त्याची देखभाल केली जाते. येथे आम्ही दोन जीव गमावले आहेत. वार यांचे पार्थिव संपूर्ण लष्करी इतमामाने त्यांच्या मूळ गावी नेण्यापूर्वी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर मानसीच्या मृतदेहावरही आवश्यक कारवाईनंतर पुष्पांजली वाहण्यात आली.