शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

रिअल लाईफमध्येही सलमान होणार बजरंगी भाईजान

By admin | Updated: August 4, 2015 14:43 IST

१५ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये असलेल्या गीता या मुकबधीर भारतीय मुलीच्या मदतीसाठी अभिनेता सलमान खानने पुढाकार घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - १५ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये असलेल्या गीता या मुकबधीर भारतीय मुलीच्या मदतीसाठी अभिनेता सलमान खानने पुढाकार घेतला आहे. गीताच्या पालकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करु असे आश्वासन सलमानने दिल्याचे पाकचे माजी मंत्री व मानवाधिकार कार्यकर्ते  अन्सार बर्नी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमधील कराची येथील  बिल्किस एधी यांच्या गीता नामक मुलगी राहतो. गीता ही मुकबधीर असून ती १५ वर्षांपूर्वी लाहोर येथे आढळली होती. भारतातून आलेल्या रेल्वे गाडीने ती पाकिस्तानमधील लाहोर येथे पोहोचली होती. गीताच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पाकमधील सामाजिक कार्यकर्ते व माजी मंत्री अन्सार बर्नी व त्यांच्या सहका-यांनी अथक प्रयत्न केले. मात्र यात त्यांना अपयश आले होते. 
नुकताच प्रदर्शित झालेल्या बजरंगी भाईजान या चित्रपटात सलमान खान पाकमधून आलेल्या एका मुकबधीर मुलीला असंख्य अडचणीवर मात करत पुन्हा पाकमध्ये सोडतो. हा चित्रपट पाकमध्येही लोकप्रिय ठरला असून बजरंगी भाईजानने आता गीताच्या पालकांचा शोध घेण्यातही मदत करावी असे आवाहन बर्नी यांनी केले होते. बर्नी यांच्या आवाहानला दिग्दर्शक कबीर खानने प्रतिसाद दिला आहे. सलमान व आम्ही यात सर्वतोपरी मदत करु असे कबीरने आम्हाला कळवले आहे अशी माहिती बर्नी यांनी ट्विटरवर दिली आहे.