शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:42 IST

बिहारमधील राजकीय घडामोडींना आता वेगळे ट्विस्ट आले आहे. बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना लगेच डिस्चार्ज देण्यात आला.

ऑनलाइन लोकमतपाटणा, दि. 26 - बिहारमधील राजकीय घडामोडींना आता वेगळे ट्विस्ट आले आहे.  बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना लगेच डिस्चार्ज देण्यात आला. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज संध्याकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर काही तासानंतर राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्या नाकाला दुखापत झाल्यामुळे उपचारांसाठी त्यांना पाटणा येथील आयजीएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयातच रात्रभर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांना काही वेळातच डिस्चार्ज देण्यात आला.  

दरम्यान, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपाने त्यांना बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, मुख्यमंत्री निवासात भाजपा आणि जदयूच्या आमदारांची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, नितीश कुमार सरकार स्थापनेसाठी दावा करणार असल्याची माहिती बिहार भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी दिली आहे. दुसरीकडे, मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार उद्या संध्याकाळी 5 वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे राजीनामा सोपवला. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांचे चिरंजीव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांच्या मुद्यावरुन नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंब्याची ऑफर दिली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचारापेक्षा अत्याचाराचा आरोप आहे.