शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

बेताल गोरक्षकांवर सक्तीने बडगा उगारा; मोदींचा आदेश

By admin | Updated: July 17, 2017 03:07 IST

गोरक्षणाच्या नावाने कायदा हाती घेण्याऱ्या बेताल गोरक्षकांवर सक्तीने बडगा उगारावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गोरक्षणाच्या नावाने कायदा हाती घेण्याऱ्या बेताल गोरक्षकांवर सक्तीने बडगा उगारावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली काही जणांची हत्या झाली होती. गोभक्तीच्या नावाने केल्या जाणाऱ्या हत्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे गेल्या महिन्यात साबरमती आश्रमातून सांगणाऱ्या मोदींनी अतिउत्साही व स्वयंभू गोरक्षकांना हा दुसऱ्यांदा इशारा दिला आहे.सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस झालेल्या बैठकीत बोलताना, पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयी केलेल्या वक्त्तव्याची माहिती नंतर संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी पत्रकारांना दिली.अनंत कुमार यांच्या म्हणण्यानुसार मोदी असे म्हणाले की, गोरक्षणाच्या नावाने कोणाही व्यक्तीला अथवा गटाला कायदा हातात घेऊ दिला जाऊ शकत नाही. असे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे.गाय मारणाऱ्यास १४ वर्षे शिक्षा; पण माणूस मारणाऱ्यास फक्त दोन वर्षे -देशाच्या विविध राज्यांत गाय मारणाऱ्यास पाच, सात किंवा १४ वर्षे तुरुंगवास ठोठावण्याचे कायदे आहेत. मात्र, बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्याकडून दुसऱ्या माणसाचा मृत्यू झाल्यास त्याला मात्र कायद्यात फक्त दोन वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. दिल्लीच्या एका न्यायाधीशांनीच एका हिट अँड रन खटल्याचा निकाल देताना कायद्यातील अशा विसंगतीवर बोट ठेवले. विरोधकांवरही शरसंधान केले-काही पक्ष राजकीय लाभासाठी गोरक्षणाच्या विषयाला राजकीय रंग देत आहेत, असा आरोप करून पंतप्रधान म्हणाले की, याला राजकीय अथवा सांप्रदायिक रंग दिला जाऊ नये, कारण असे करण्यात देशाचे काहीच भले होणार नाही. त्याऐवजी एकत्र येऊन या अनिष्ट गोष्टीचे उच्चाटन करावे.सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातही विरोधक हा मुद्दा आग्रहाने मांडतील, याची जाणीव ठेवून त्यांची धार बोथट करण्यासाठी पंतप्रधानांनी हे कडक भाष्य केले असावे, असे मानले जात आहे.देशात गोरक्षणाचा कायदा आहे, परंतु व्यक्तिगत दुस्वासापोटी केले जाणारे गुन्हे खपवून घेतले जाऊ शकत नाहीत. -नरेंद्र मोदीलालू यादवांना मोदींच्या आडून कानपिचक्या-राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वीप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बिहारचे उपमुख्यमंत्रिपद सोडावे, यासाठी जोरदार दबाव येत आहे.मात्र, राजदने त्यास ठाम नकार दिला आहे. या पार्श्वभूमिवर, सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू कलेल्या लढ्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करताना मोदींनी लालूंना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या.भ्रष्टाचाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये, कारण त्यामुळे समाजात राजकीय नेत्यांची प्रतिमा मलीन होते, असे ते म्हणाले.