शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला दोन हजारांत विकले

By admin | Updated: January 13, 2017 04:10 IST

गरिबीने पिचलेल्या आणखी एका आदिवासी महिलेला आपले दोन दिवसांचे नवजात बाळ दुसऱ्या एका महिलेला

अम्बिकाप्रसाद कानुनगो / भुवनेश्वरगरिबीने पिचलेल्या आणखी एका आदिवासी महिलेला आपले दोन दिवसांचे नवजात बाळ दुसऱ्या एका महिलेला दोन हजार रुपयांत विकावे लागल्याची घटना ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील काजला या आदिवासी पाड्यात घडली आहे. गीता मुर्मू असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. सहा वर्षांची मुलगी आणि १० वर्षांच्या मुलाची आई असलेली गीता तिसऱ्यांदा गर्भवती असताना तिचा नवरा सोडून गेला. ‘नवऱ्याने दोन्ही मुले माझ्याजवळ सोडून माझा त्याग केला. आम्हाला धड दोनवेळचे जेवणही मिळत नाही. अशात तिसऱ्याला कसे पोसणार? तिसऱ्या मुलाचा सांभाळ करू शकत नसल्याने त्याला विकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता,’ असे गीता म्हणाली.दरम्यान, नवजात बालकाला विकल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्याची स्वत:हून दखल घेतली आणि केंद्रपाडा जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून चार आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. नवजात बालकाला विकणाऱ्या मातेला काय मदत केली व तिच्या पुनर्वसनासाठी काय-काय केले, याचा तपशीलही सादर करण्यात यावा, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.गीता मुर्मू आपल्या दोन्ही मुलांचे पालनपोषण करण्यासाठी रोजंदारीवर काम करते. सध्या ती आजारी असून केंद्रपाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. ‘दारिद्र्यामुळे दोन दिवसांच्या बाळाला मी ब्रह्मार्दिया पटाना येथील ममता साहू या महिलेला विकले. आधीच मी माझ्या दोन मुलांना पोटभर जेवण देऊ शकत नाही. अशातच हा तिसरा आला. याचा सांभाळ करणे कठीण असल्यानेच त्याला विकण्याचे ठरविले. ममतालाही मुलाची गरज होती म्हणून बाळ तिलाच विकण्याचा निर्णय घेतला. ममताने बाळाच्या बदल्यात मला दोन हजार रुपये देऊ केले आहेत,’ असे गीताने सांगितले.‘आम्हाला दोनवेळचे जेवणही मिळत नाही. आम्हाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रेशन कार्डपासूनही वंचित ठेवण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या योजनेत माझे नावच नोंदविलेले नाही,’ असे गीता म्हणाली.भीषण गरिबीमुळे उचलले पाऊलगीताकडून बाळ विकत घेण्यामागचे कारण ममता साहूने सांगितले. ती म्हणाली,‘मला मुलगा हवा होता. गीता दोन मुलांचे पोट भरू शकत नाही, हे मी पाहिले. अशातच तिसरा मुलगा पोटात असल्याचे पाहून मी तिला समजावले आणि हा तिसरा मुलगा मला देण्यास तयार केले. तिच्या तिसऱ्या बाळंतपणावर मी ६०० रुपयेही खर्च केलेले आहेत. मी तिला मुलांसह माझ्या घरी आणले आणि दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. बाळंतपणानंतर ती महिनाभर माझ्या घरी राहिली.’ ममताने आता बाळ परत करण्याचीही तयारी दाखविली आहे.