शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर राहुल गांधींचं जन्मलेलं बाळही काँग्रेस अध्यक्ष होईल- अमित शाह

By admin | Updated: January 30, 2017 14:07 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. जर राहुल गांधींनी लग्नाचा विचार केल्यास त्यांचं येणारं बाळही आगामी काळात विरोधी पक्षाचा नेता होईल, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर शरसंधान साधलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घराणेशाहीवर टीका करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. लखनऊमध्ये उत्तर प्रदेश आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अमित शाह शनिवारी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींचं कुटुंब हे घराणेशाहीचं उत्तम उदाहरण आहे. नेहरुंनंतर इंदिरा गांधी राजकारणात आल्या आणि त्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. आता राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा होऊ पाहत आहेत, माझा या घराणेशाहीला तीव्र विरोध आहे, असंही अमित शाह म्हणाले आहेत. आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट देणे ही घराणेशाही नसल्याचंही त्यांनी प्रतिपादन केलं आहे.काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीमुळे भाजपाला उत्तर प्रदेशात काहीच फरक पडणार नाही. फक्त समाजवादी पार्टीमुळे भाजपावर थोड्या फार प्रमाणात परिणाम होऊ शकतो. अखिलेश उत्तर प्रदेश राज्याला लुटत आहेत, तर राहुल गांधी देशाला लुटत आहेत, असं म्हणत त्यांनी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीवरही टीका केली आहे.