शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Babri Masjid Demolition Verdict : जफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार

By बाळकृष्ण परब | Updated: September 30, 2020 15:44 IST

Babri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी निकाल देताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

ठळक मुद्देहा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे१९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहेकलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे

लखनौ - बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी दीर्घकाळ सुरू असलेल्या खटल्यावर अखेर आज लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, या निकालानंतर भाजपाच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी बाबरी मशीदच्या बाजूने असलेल्या मंडळींनी वरच्या न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे प्रसिद्ध वकील जफरयाब जिलानी यांनी सांगितले आहे.लखनौमधील सीबीआय न्यायालयाने आज निकाल सुनावताना ३२ आरोपींना मुक्त केल्यानंतर निकालाबाबत प्रतिक्रिया देताना सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी म्हणाले की, हा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे. १९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि प्रसारमाध्यमांतील लोकांनी या लोकांचे नाव घेतले होते. दरम्यान, लालकृष्ण अडवाणींसारखे अन्य नेते एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो अशा घोषणा द्यायचे.कलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे. आम्ही आता या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार आहोत, अशी माहिती जिलानी यांनी दिली.बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपींची आज न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी  माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले होते. दरम्यान, बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे

टॅग्स :babri masjid verdictबाबरी मशीद निकालbabri masjidबाबरी मस्जिदAyodhyaअयोध्याCourtन्यायालय