शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Babri Masjid Case: बाबरी मशीद प्रकरणातून सर्व आरोपींची सुटका; आडवाणी म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: September 30, 2020 14:00 IST

Babri Masjid Case: लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींसह ३२ जणांची सुटका

लखनऊ: बाबरी मशीद प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची सुटका केली आहे. वादग्रस्त ढाचा पाडल्याची घटना पूर्वनियोजित नव्हती. ती अचानक घडली, असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. सीबीआयकडून करण्यात आलेले अनेक युक्तिवाद न्यायालयानं फेटाळून लावले आणि २८ वर्षांपासून सुरू असलेल्या बाबरी मशीद खटल्यात निकाल दिला.भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह एकूण ३२ जण या खटल्यात आरोपी होते. न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यावर आडवाणींनी आनंद व्यक्त केला. 'सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलेल्या निकालाचं मी मनापासून स्वागत करतो. राम मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात मी आणि भाजपनं स्वत:ला झोकून दिलं होतं. हा निर्णय राम मंदिराबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब करणारा आहे,' असं आडवाणी म्हणाले.'सर्वोच्च न्यायालयानं नोव्हेंबर २०१९ मध्ये राम मंदिराबद्दलचा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामुळे भव्य राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. आता बाबरी मशीद प्रकरणाचाही निकाल आला आहे. या सगळ्या पाठोपाठ घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहून आनंद वाटतो,' अशी भावना आडवाणींनी व्यक्त केली.'फोटोतून कोणी दोषी ठरत नाही'फोटोतून कोणी दोषी ठरत नसल्याचं न्यायमूर्तींनी निकाल सुनावताना म्हटल्याची माहिती निकालानंतर न्यायालयातून बाहेर आलेल्या वकिलांनी दिली. 'वादग्रस्त ढाता पाडण्याचा कोणताही प्रयत्न आरोपींनी केला नाही. त्या दिवशी घडलेली घटना पूर्वनियोजित असती, तर तिथल्या रामललाच्या मूर्ती आधीच हटवल्या गेल्या असत्या,' असं न्यायालयानं म्हटलं.न्यायालय म्हणतं, घटना अचानक घडलीही घटना पूर्वनियोजित नव्हती. ती अचानक घडली, असं न्यायालयानं निकाल सुनावताना म्हटलं. न्यायालयासमोर ठेवण्यात आलेले पुरावे सर्व आरोपींची सुटका करण्यासाठी पुरेसे आहेत, असं न्यायमूर्ती म्हणाले. यावेळी न्यायालयाकडून सादर करण्यात आलेले पुराव्यांवरही प्रश्न उपस्थित केले. 

टॅग्स :babri masjidबाबरी मस्जिदbabri masjid verdictबाबरी मशीद निकालRam Mandirराम मंदिरLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी