शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बाबरी प्रकरणी आडवाणींसह १२ जणांवर गुन्हेगारी कटाचा आरोप निश्चित

By admin | Updated: May 30, 2017 15:09 IST

बाबरी मशिदप्रकरणी न्यायालयाने भाजपा ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींसह १२ जणांवर गुन्हेगारी कटाचा आरोप निश्चित केला आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 30 - बाबरी मशिदप्रकरणी न्यायालयाने भाजपा ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींसह १२ जणांवर गुन्हेगारी कटाचा आरोप निश्चित केला आहे. लालकृष्ण आडवाणींसह १२ जणांनी आरोप रद्द करण्याची मागणी करत याचिका केला होती. मात्र विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली. 
 
याआधी न्यायालयाने भाजपा नेत्यांना दिलासा दिला देत सर्व आरोपींना जामीन मंजूर केला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. 20 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशींना जामीन मंजूर झाल्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र तोपर्यंत आरोप निश्चितीबद्दल न्यायालयाने  निर्णय दिला नव्हता. न्यायालयाने आपला निर्णय़ सुनावला असून लालकृष्ण आडवाणींसह १२ जणांवर गुन्हेगारी कटाचा आरोप निश्चित केला आहे.
 
 
काय आहे नेमके प्रकरण ?
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. या प्रकरणी रायबरेली आणि लखनौ येथील कोर्टात सुनावणी सुरूआहे. लखनौ कोर्टात कारसेवकांविरोधात तर, रायबरेली येथील न्यायालयात व्हीव्हीआयपी आरोपींविरोधात खटल्याची सुनावणी सुरू आहे.   
 
बाबरी प्रकरणी 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने आडवाणींसह 13 नेत्यांवरुन गुन्हेगारी कारस्थान रचल्याचा आरोप हटवला होता. सीबीआयने हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. आडवाणी, जोशी, उमा भारतींवर चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप आहे. 
 
 या भाषणांनी प्रेरीत होऊन कारसेवकांनी 1992 साली बाबरी मशीद पाडली. बाबरी मशीद पाडली त्यादिवशी जवळच उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरुन या नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे दिली. बाबरी मशीद पाडण्याचा कटाचा हा एक भाग होता, असे सीबीआयचे म्हणणे आहे.