शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रांगोळीतून साकारली बाबासाहेबांची विश्वविक्रमी प्रतिमा... १७ हजार चौरस फूट : विश्वविक्रमासाठी नामांकन पाठविणार

By admin | Updated: April 14, 2016 00:53 IST

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त शहरातील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्यावतीनेशिवतीर्थ मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १७ हजार चौरस फूट विश्वविक्रमी रांगोळी बुधवारी साकारण्यात आली. विशेष म्हणजे शरद विश्वासराव भालेराव या एकट्या तरुणाने पाच तास ४१ मिनिटांमध्ये ही रांगोळी साकारली. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी आयोजकांकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त शहरातील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्यावतीनेशिवतीर्थ मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १७ हजार चौरस फूट विश्वविक्रमी रांगोळी बुधवारी साकारण्यात आली. विशेष म्हणजे शरद विश्वासराव भालेराव या एकट्या तरुणाने पाच तास ४१ मिनिटांमध्ये ही रांगोळी साकारली. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी आयोजकांकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानच्यावतिने यंदा शहरात प्रथमच विश्वविक्रमी रांगोळी काढण्याचा उपक्रम राबविला. या रांगोळीसाठी सकाळपासूनच तयारी करण्यात आली. यामध्ये प्रथम १७ हजार चौरस फूट जागेमध्ये दोर्‍यांच्या साहाय्याने चौकटी तयार करण्यात येऊन त्यामध्ये प्रथम शरद भालेराव यांनी रेखाचित्र तयार केले. त्यानंतर त्यामध्ये चार पर्यावरणपूरक रंगांचा वापर करुन पाच तास ४१ मिनिटांमध्ये ही रांगोळी पूर्ण केली. यासाठी दीड टन रांगोळीचा वापर करण्यात आला. या १७ हजार चौरस फूट परिसरात इतर कोणालाही प्रवेश नव्हता.
कमी वेळ व आकार मोठा हा या रांगोळीचा विश्वविक्रम असून या पूर्वी सोलापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच १२ तासांमध्ये १५ हजार चौरस फूट रांगोळी काढण्यात आली होती. त्यामुळे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नामांकन पाठविणार असल्याचे प्रतिष्ठानच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक जोशी यांनी सांगितले. परिक्षक म्हणून ॲड. के.जहांगिर, एस.के. नारखेडे, जे.एम.अग्रवाल, नितीन इंचोले यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. यासाठी राजेंद्र भालेराव हरीशचंद्र सोनवणे, जयंत वाघ, दीपक जोशी, किशोर सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला.

मान्यवरांची भेट...
ही महाकाय रांगोळी पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, महापौर नितीन ल‹ा, उपमहापौर ललित कोल्हे, मनपा उपायुक्त प्रदीप जगताप, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, नगरसेवक अनंज जोशी, कैलास सोनवणे, जितेंद्र मुंदडा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आदींनी भेट दिली.