शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाबराने मंदिर पाडले नाही, तेथे मशिदही बांधली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 05:14 IST

अयोध्या वाद : हिंदू पक्षकाराचा सुप्रीम कोर्टात दावा

नवी दिल्ली : मुघल बादशहा बाबर अयोध्येत कधी आलाच नव्हता व सन १५२८ मध्ये तेथील वादग्रस्त जागेवरील मंदिर पाडून तेथे मशिद बांधण्याचा आदेशही त्याने कधी दिला नव्हता, असा दावा एका हिंदू पक्षकाराने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला.

अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जमिनीची तीन समान भागांत वाटणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केलेल्या अपिलांवरील दैनंदिन सुनावणी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील विशेष घटनापीठापुढे १४ व्या दिवशीही अपूर्ण राहिली. बुधवारी ‘अखिल भारतीय श्री राम जन्मभूमी पुनरुद्धार समिती’ या हिंदू पक्षकारातर्फे ज्येष्ठ वकील पी. एन. मिश्रा यांचा युक्तिवाद झाला.‘तुझुक-ई-बाबरी’ (बाबरनामा), ‘हुमायूंनामा’, ‘अकबरनामा’ आणि ‘तुझुक-ई-जहांगिरी’ या मुघल बादशहांच्या तत्कालिन चरित्रात्मक ग्रथांचे संदर्भ देत अ‍ॅड. मिश्रा म्हणाले की, खास करून ‘बाबरनामा’मध्ये बाबराचा सेनापती मिर बकी याने अयोध्येतील मंदिर पाडल्याचा किंवा तेथे मशिद बांधल्याचा कुठेही उल्लेख नाही. ते म्हणाले की, बाबर कधी अयोध्येत आलाच नव्हता त्यामुळे सन १५२८ मध्ये त्याने तेथील मशिद पाडण्याचा व मशिद बांधण्याचा आदेश देण्याचा प्रश्नच येत नाही. एवढेच कशाला बाबराचा मिर बकी नावाचा कोणी सेनापती असल्याचाही उल्लेख आढळत नाही.

हे सर्व संदर्भ तुम्ही कशासाठी देत आहात, या न्यायमूर्तींच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅड. मिश्रा म्हणाले की, आमचे मंदिर हे प्रत्यक्षात मशिद असल्याचा मुस्लिम पक्षकारांचा दावा आहे. प्रतिवादी या नात्याने तो खोडून काढण्यासाठी मला हे दाखवावे लागत आहे.त्यांच्या या कथित मशिदीला बाबरी मशिद म्हणायचे असेल तर ती बाबराने बांधली किंवा त्याच्या आदेशावरून बांधली गेली हे सिद्ध व्हायला हवे. एखादी व्यक्ती खोटे बोलू शकते, पण इतिहासातील परिस्थितीजन्य संदर्भ असत्य असू शकत नाहीत.

अ‍ॅड. मिश्रा पुढे असेही म्हणाले की, या उलट अबुल फजलने सन १५७६ मध्ये लिहिलेले ‘ऐन-ई-अकबरी’ पाहा. त्यात फजल अयोध्येतील ‘रामकोट’चा उल्लेख करतो व ती जागा श्री रामाचे जन्मस्थान असल्याची हिंदूंची श्रद्धा असल्याचेही लिहितो. या पुस्तकात याच परिसरातील तीन थडग्यांचे तपशीलवार वर्णन आहे, पण तेथे मशिद असल्याचा पुसटसाही उल्लेख नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर