शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याद्वारे मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा डाव - बाबा रामदेव

By admin | Updated: May 1, 2015 14:01 IST

मला टार्गेट करुन विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - योगगुरु बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या 'दिव्य पूत्रबीजक' या औषधावरुन गदारोळ निर्माण झाला असतानाच शुक्रवारी रामदेव यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर पलटवार केला आहे. मला टार्गेट करुन विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे. पूत्रबीजक हे औषध मुलं होण्यासाठी असून फक्त मुलगा होण्यासाठी हे औषध नाही अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली आहे. 
गुरुवारी जदयूचे खासदार के सी त्यागी यांनी राज्यसभेत बाबा रामदेव यांच्या फार्मसीतील 'दिव्य पूत्रबीजक' या औषधासंदर्भात गंभीर आरोप केले होते. हे औषध घेतल्यास मुलगा होतो असा दावा करत या औषधाची विक्री सुरु असल्याचे त्यागी यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिले होते. यावरुन राज्यसभेत विरोधकांनी एकजूट दाखवत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यासंदर्भात चौकशी करु असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे. 
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाबा रामदेव यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे जात त्यागी यांचे आरोप फेटाळून लावले. बाबा रामदेव म्हणाले, आमच्या औषधाच नाव पूत्रजीवक आहे, पण याचा अर्थ हे औषध मुल होण्यासाठी आहे, फक्त मुलगा होण्यासाठी नाही. विरोधकांना ऐवढा आक्षेप असेल तर आम्ही औषधाखाली  'पूत्रजीवक हे औषध फक्त मुलं होण्यासाठी असून यात मुलगा किंवा मुलगी यांचा संबंध नाही' असे स्पष्टीकरण देणारा संदेश छापून देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार चुकीचे मुद्दे संसदेत उपस्थित करत असून माझ्यावर आरोप करुन मोदींवर निशाणा साधण्याचे उद्योग विरोधकांनी सुरु केले आहेत असा आरोप त्यांनी केला.