शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाक कलाकारांना केवळ पैसा, बिर्याणीशी देणंघेणं - बाबा रामदेव

By admin | Updated: October 20, 2016 09:16 IST

कलाकार दहशतवादी नसतात, मात्र त्यांच्यामध्ये जराही माणुसकी नाही का?, त्यांना फक्त सिनेमांद्वारे पैसा कमवायचे आणि केवळ बिर्याणी खाण्याशीच देणेघेणे आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 20 -  भारतात पाकिस्तानी कलाकारांवर घालण्यात आलेल्या बंदीचा विषय सध्या चर्चेत आहे. यावर योगगुरू बाबा रामदेव यांनीही पाकिस्तानी कलाकारांना भारतात घालण्यात आलेल्या बंदीचे समर्थन करत त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या बातमीनुसार, 'कलाकार दहशतवादी नसतात, मात्र त्यांच्यामध्ये जराही माणुसकी नाही का?, त्यांना फक्त सिनेमांद्वारे पैसा कमवायचा आणि केवळ बिर्याणी खाण्याशीच देणेघेणे आहे. पाकिस्तानी कलाकार उरी हल्ला आणि अन्य दहशतवादी हल्ल्यांचा का निषेध व्यक्त करत नाहीत?', असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर तोफ डागली आहे. दरम्यान, संधी मिळाल्यास पाकिस्तानमध्ये जाऊन योग शिकवू, तसेच पतंजलीचे यूनिटही तेथे उभारू, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. 
 
यावर अधिक स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, मात्र 'मी पाकिस्तानी कलाकारांप्रमाणे नाही करणार, तिथे पैसा कमवून भारतात नाही आणणार. पाकिस्तानातून मिळणारा पैसा तेथील लोकांवर खर्च करण्यात येईल', असे म्हणत त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना टोमणाही हाणला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. 'वाईट गोष्टींचा नाश करणे म्हणजे हिंसा नाही. पंतप्रधान मोदी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, दहशतवादी मसूद अजहर आणि हाफिज सईद सारख्यांचाही खात्मा करतील, असे मला वाटते', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. कारण 'या वस्तूंच्या माध्यमातून चीन प्रचंड प्रमाणात पैसा कमावून पाकिस्तानला मदत करतो', त्यामुळे चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनदेखील बाबा रामदेव केले आहे.