शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बाबा राम रहीमला जन्मठेप ठोठवा!, दोन बलात्कार पीडितांचा न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 04:23 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावा, अशी विनंती दोन बलात्कारपीडित महिलांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयास केली आहे.

चंदीगढ : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावा, अशी विनंती दोन बलात्कारपीडित महिलांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयास केली आहे.या महिलांच्या फिर्यादीवरून उभ्या राहिलेल्या बलात्काराच्या दोन खटल्यांमध्ये पंचकुला येथील विशेष न्यायालयाने राम रहीमला २८ आॅगस्ट रोजी १० वर्षांची कैद आणि १५ लाख रुपये अशी शिक्षा ठोठावली होती. राम रहीम सध्या रोहतक जिल्ह्यातील सुनरिया तुरुंगात आहे.शिक्षा वाढविण्यासाठी या महिलांनी उच्च न्यायालयात फेरविचार अर्ज केला असल्याचे त्यांचे वकील अ‍ॅड. नवकिरन सिंग यांनी सांगितले. बाबाला जन्मठेप का द्यायला हवी, याचे कारण विषद करताना अर्जात म्हटले आहे की, या पंथामध्ये अनुयायी बाबांना ‘पिता’ मानतात. या नात्याने या दोन्ही महिला भावनिक व धार्मिकदृष्ट्या बाबांच्या कह्यात होत्या. बाबाने या आपल्या आध्यात्मिक पदाचा गैरवापर करून विश्वास आणि श्रद्धेला तडा दिला. त्यामुळे त्याला बलात्कारासाठी देता येऊ शकणारी जन्मठेप ही जास्तीत जास्त शिक्षा दिली जाणे आवश्यक आहे.बाबा गुरमीत राम रहीमची कथित मानलेली मुलगी हनीप्रीत इन्सान (खरे नाव प्रियांका तनेजा) हिची येथील विशेष न्यायालयाने बुधवारी सहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.बलात्कार खटल्यात बाबाला शिक्षा झाल्यानंतर पंथाच्या अनुयायांनी केलेल्या हिंसाचारात ३८ जण ठार तर २०० हून अधिक जखमी झाले होते. या हिंसाचारास चिथावणी देणे व शिक्षेनंतर बाबाचे अपहरण करण्याच्या कटात सहभागी असणे या आरोपांवरून हनीप्रीतला मंगळवारी अटक झाली होती.ती ३९ दिवस फरार होती. न्यायालयात तिने छातीत दुखत असल्याची तक्रार केली, परंतु डॉक्टरांनी ती ठाकठीक असल्याचा अहवाल दिला.तिची कालच अटकेनंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.

टॅग्स :Dera Saccha Saudaडेरा सच्चा सौदाBaba Ram Rahimबाबा राम रहीमCourtन्यायालयGurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीम