शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधे १२ टक्के महागणार

By admin | Updated: June 30, 2017 00:31 IST

वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) १ जुलैपासून लागू होणार असल्याने, काय महागणार आणि काय स्वस्त होणार, याची चर्चा सुरू आहे.

कोची : वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) १ जुलैपासून लागू होणार असल्याने, काय महागणार आणि काय स्वस्त होणार, याची चर्चा सुरू आहे. पण जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधे १२ टक्क्यांनी महागणार आहेत. यामुळे औषधी उत्पादक आणि किरकोळ दुकानदारांत नाराजी आहे. आयुर्वेद, योग, युनानी, नैसर्गिक आणि होमिओपॅथी या उपचार पद्धतींचा संशोधन विकास करणे आणि या पारंपरिक वैद्यकीय उपचार पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केली. जीएसटीमुळे ही औषधे महागणार असल्याने भारतीय औषधे उत्पादक संघटनेने (एमएमओआय) आयुष मंत्रालयाकडे धाव घेत जेनेरिक औषधींवरील कर न लावण्याची तसेच उत्पादन मालकीवर ५ टक्के कर लावण्याचे साकडे घातले आहे. सध्या जेनेरिक औषधांवर २ टक्के आणि उत्पादन मालकीवर ६ टक्के कर आहे.सरकारने जेनेरिक औषधे आणि औषधोत्पादन मालकीवर १२ टक्के जीएसटी निश्चित केला. आयुर्वेदिक प्रसाधने, साबणावर १८ टक्के कर निश्चित केला आहे, असे एमएमओआयचे सरचिटणीस डॉ. डी. रामनाथन यांनी सांगितले. जुने आजार बरे करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे दीर्घकाळ घ्यावी लागतात. उदा. धनुर्वातासाठीच्या तेलाची ४५० मिली लीटर बाटलीची किंमत ३५० रुपयांहून अधिक आहे. १० ते १५ दिवस ती पुरते. वृद्धत्वामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींसाठी नियमित औषधे घेणाऱ्यांचा खर्च सरकारने वाढवू नये. चढ्या करामुळे किमती वाढणार असल्याने गरीब, गरजूंना औषधोपचार परवडणार नाहीत.अनियमित पुरवठ्यामुळे कच्च्या मालाचा भाव १०० ते २०० टक्क्यांनी वाढला आहे. धनुर्वात तेल, महारसनाडी काश्यम, अगस्त्य रसायन, अष्टचूर्ण, त्रिफळाचूर्ण यांसारख्या औषधांवर कर आकारलाच जाऊ नये, असे एमएमओआयचे म्हणणे आहे. केरळातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचा (एकेसीडीए) असा दावा आहे की, औषधी दुकानांतील ९० टक्के औषधे १२ टक्क्यांनी महागतील. निरोध, गर्भनिरोधक, रक्तद्रव आणि मूत्रपिंड रक्तशुद्धीकरण यासाठी लागणाऱ्या इंजेक्शन्सवर ५ टक्के कर असेल. औषधशास्त्रात या औषधांचे प्रमाणही अत्यल्प आहे, असे एकेसीडीएचे प्रदेशाध्यक्ष ए. एन. मोहन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)