शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

एके काळचा आयआयटी प्रोफेसर देतोय आदिवासींना आयुष्याचे धडे

By admin | Updated: May 19, 2016 04:24 IST

जगभरातील महत्त्वपूर्ण उच्च पदव्या झोळीत असलेले आलोक सागर कधी काळी आयआयटी दिल्ली येथे प्रोफेसर राहिले आहेत,

अनिलसिंग ठाकूर- बैतुल- मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांची तर अगदी अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी बनावट असल्याच्या आरोपांवरून वाद उफाळला असताना, आलोक सागर यांचे नाव वेगळ्या कारणाने समोर आले आहे.देश आणि जगभरातील महत्त्वपूर्ण उच्च पदव्या झोळीत असलेले आलोक सागर कधी काळी आयआयटी दिल्ली येथे प्रोफेसर राहिले आहेत, हे बैतुलच्या आदिवासी भागात तुम्ही गेलात आणि त्यांच्याकडे बघितले, तर विश्वासच बसणार नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजनसुद्धा त्या काळी दिल्ली विद्यापीठात शिकत होते. आलोक सागर गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून मध्य प्रदेशच्या घोडाडोंगरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या शाहपूर ब्लॉकमधील कोचामाऊ गावी एका आदिवासीप्रमाणे जीवन जगत आहेत.तेथील गावकरी आणि परिसरातील लोक त्यांना सेवाभावी कार्यकर्ते म्हणून ओळखतात. आदिवासींपैकी कुणालाही त्यांच्या वास्तविक शैक्षणिक गुणवत्तेची माहिती नाही. गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्या या पदव्या एका झोळीत पडून आहेत. मात्र, अलीकडे कारणच तसे घडले की, त्यांच्या या उच्च पदव्यांना जगासमोर यावे लागले.आलोक सागर यांचे वडील भारतीय महसूल सेवेत अधिकारी होते, तर आई दिल्ली मिरांडा हाउस येथे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. आलोक यांनी १९७३ मध्ये आयआयटी दिल्ली येथून एमटेक केल्यानंतर 1977मध्ये अमेरिकेच्या ह्युस्टन विद्यापीठातून पीएच.डी मिळविली. याच विद्यापीठात पदव्युत्तर डॉक्टरेट मिळवून कॅनडाच्या डलहौसी विद्यापीठात समाजशास्त्र विभागात फेलोशिप पूर्ण केली. भारतात परतल्यानंतर ते दिल्ली आयआयटी येथे प्रोफेसर म्हणून रूजू झाले. काही काळानंतर नोकरी सोडून ते समाजसेवेकडे वळले. आदिवासींसाठी काही करण्याची इच्छा बाळगत ते १९९० च्या काळात बैतुलजवळील कोचामाऊ येथे पोहोचले. नव्या आयुष्याची सुरुवात झाली. हळूहळू ते आदिवासींमध्ये मिसळले. आदिवासींनी जवळ यावे, यासाठी त्यांनी उच्चशिक्षित असल्याची ओळख दडवून ठेवली. त्यांनी आदिवासींचे आयुष्य बदलण्यास स्वत: खडतर जीवनाचा मार्ग अवलंबला. आतापर्यंत त्यांनी ५० हजारांवर फळझाडे लावली आहेत. त्याचा लाभ गावकरी, आदिवासींना मिळतो. ते झोपडीत राहतात. विहिरीतून पाणी काढून ते स्वत: झाडांना देतात. राहायला झोपडी, फिरायला सायकल... ते एका झोपडीत राहतात. सायकलवरून या भागात फिरतात. मुलांना शिकवितात. ते बहुभाषी असून आदिवासींची भाषाही शिकले आहेत. ‘मी माझे शिक्षण आणि पदवींबद्दल आदिवासींना सांगितले असते, तर त्यांनी माझ्यापासून अंतर राखले असते,’ असे ते सांगतात. स्वत: हाताने दळण दळतात. आलोक यांचे छोटे बंधू अंबुज सागर आयआयटी दिल्लीला प्रोफेसर असून, त्यांच्या एक भगिनी कॅनडामध्ये तर दुसऱ्या भगिनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सेवेत होत्या.>अचानक आले प्रकाशझोतात... सध्या घोडाडोंगरी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, ३० मे रोजी मतदान होणार असल्यामुळे बाहेरील लोकांना हाकलण्यासाठी पोलिसांनी मोहीम छेडली आहे. पोलिसांची वक्रदृष्टी आलोक सागर यांच्यावर पडली आणि लगेच फर्मान धाडले गेले. हा भाग सोडला नाही, तर कारागृहात डांबण्याची धमकी एका पोलिसाने दिली. आलोक सागर हे थेट पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पदव्यांची माहिती देताच पोलिसांवर हैराण होण्याची पाळी आली.