शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अजब ! बायकोला बुडताना वाचवलं म्हणून पती भडकला

By admin | Updated: October 28, 2016 10:20 IST

आपली पत्नी बुडताना वाचली हे पाहून खूश होण्याऐवजी तिच्या पतीचा पाराच चढला.

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. 28 -  साबरमती येथे नदीमध्ये बुडणा-या एका विवाहित महिलेला वाचवण्यात आले. मात्र, आपली पत्नी वाचली हे पाहून खूश होण्याऐवजी तिच्या पतीचा पाराच चढला. एवढंच नाही तर पत्नीला वाचवणा-या व्यक्तीला त्याच्या रागाचा आणि धमकीचा सामनादेखील करावा लागला.  पत्नीला वाचवले म्हणून आभार मानण्याऐवजी हा व्यक्ती असा का वागत आहे?, असे कोडे त्या कर्मचा-याला पडले. 
 
साबरमती रिवरफ्रंटजवळ फायर अँड इमर्जन्सी सर्विसेसच्या (AFES) कर्मचा-याने या विवाहित महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवले. भारत मंगेला असे या कर्मचा-याचे नाव असून तो साबरमती रिवरफ्रंट येथे सेवेसाठी तैनात होता. ऑन ड्युटी असताना महिलेला डुबताना पाहून त्याने तिला वाचवले. मात्र यानंतर महिलेचा पती रागात आणि तावातावाने  विचारू लागला की 'कुणाच्या परवानगीने त्याच्या पत्नीला आत्महत्या करण्यापासून वाचवले?', असे मंगेला यांनी सांगितले. यावेळी त्याने आमचा फोटोही काढला आणि त्यावरुन धमकी देऊ लागला. हे प्रकरण अजबच वाटल्याने त्याने झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. 
 
वल्लभ सदनमागे 37 वर्षांच्या महिलेने नदीमध्ये उडी मारली. यानंतर फायर अँड इमर्जन्सी सर्विसेसची टीम (AFES)  या महिलेला वाचवण्यासाठी पोहोचली आणि तिला सुखरुप वाचवलेदेखील.  कर्मचा-यांनी याची माहिती तिच्या पतीला दिली. यावेळी तो घटनास्थळी धावत-धावत तर मात्र कर्मचा-यांवर आरडाओरडा करू लागला. मंगेला यांनी सांगितल्यानुसार, ' माझ्या पत्नीला का वाचवले', असे उलट प्रश्नच महिलेच्या पती केला. त्याची ही प्रतिक्रिया आश्चर्यचकीत करणार होती.
 
अशा वेळी धन्यवाद मानून आभार व्यक्त केले जातात, मात्र हा व्यक्ती तर धमकी देऊ लागला'. यानंतर हे प्रकरण रिवरफ्रंट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले, जिथे AFES कर्मचारी, महिला आणि तिच्या पतीचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेचे तिच्या पतीसोबत 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. मात्र सततच्या होणा-या भांडणांमुळे कंटाळल्याचे महिलेने सांगितले.
 
या दोघांनाही एकमेकांचे बाहेर दुस-या व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन वाद- भांडण होत होती. पोलिसांनी
यावेळी आपापसातील भांडण मिटवण्याची समज देऊन दोघांनाही घरी सोडून दिले.