शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक हिंसाचार कायद्याची जाणीव- जागृती कार्यशाळा

By admin | Updated: March 29, 2016 00:24 IST

जळगाव- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ अंतर्गत सदर कायद्याचा प्रचार व प्रसिद्धीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अल्पबचत भवन येथे सोमवारी करण्यात आले.

जळगाव- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ अंतर्गत सदर कायद्याचा प्रचार व प्रसिद्धीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अल्पबचत भवन येथे सोमवारी करण्यात आले.
अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे व प्रमुख पाहुणे म्हणून समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.वाय.जी.महाजन, प्रा.डॉ.नितीन बडगुजर तसेच मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून ॲड.राजेंद्र वंजारी, सुधा गिंधेवार, बालविकास प्रकल्प अधिकारी व आशादीप महिला वसतिगृहाच्या अधिक्षिका, प्रियंका तारु हे उपस्थित होते. कार्यक्रमात गटविकास अधिकारी यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देऊन कायद्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी आपली ग्रामपातळीवरील भूमिका महत्वाची असल्याचे व त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. ॲड.राजेंद्र वंजारी यांनी कौटुंबिक हिंसाचार अधिनियमातील तरतुदींचा उहापोह करून जाणीव जागृती करून प्रत्येकाने संवेदनशील होणे तसेच कायद्यातील संरक्षण अधिकार्‍यांची महत्त्व पूर्ण भूमिका इ.वर सविस्तर मार्गदर्शन केे. समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ.वाय.जी.महाजन यांनी समाजातील एकत्र कुटुंब पद्धतीच्या र्‍हास होत असल्यामुळे सुसंवादा अभावी सामाजिक स्थिती विस्कळीत झाल्याचे प्रतिपादन केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा.नितीन बडगुजर यांनी तळागाळतील महिलांपर्यंत अंगणवाडी सेविकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगून कायद्याबाबत जनजागृती करण्यावर अधिक भर देण्याबाबत आवाहन केले. प्रकाश राठोड, अध्यक्ष उडान बहु.संस्था यांनीदेखील मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार यांनी केले. आभार तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी महेंद्र बेलदार यांनी केले. सूत्रसंचालन भूषण लाडवंजारी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचे भूषण लाडवंजारी यांनी तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, संस्थांचे अधीक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेत अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, तालुकास्तरीय सर्व संरक्षण अधिकारी, समुपदेशक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.