येवला : तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे यांना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आरोग्य शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात दहा वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून ग्रामीण नागरिकांत त्यांनी सरकारी उपचाराविषयी सकारात्मक विचार रुजवले. सावरगावचा दवाखाना सकाळपासूनच गजबजलेला असतो. वर्षातील सरासरी बा रु ग्ण चिकित्सा २०००पेक्षा अधिक असते. कुटुंबकल्याण अंतर्गत २५००पेक्षा अधिक शस्त्रक्रि या यात ७० टक्केपेक्षा अधिक रु ग्णांची संख्या आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. (फोटो २२ येवला )फोटो मेल..सावरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे यांना आरोग्य शिरोमणी पुरस्कार प्रदान करताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. राम शिंदे.
सुरेश कांबळे यांना पुरस्कार प्रदान
By admin | Updated: May 22, 2016 23:59 IST