शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरस्कार वापसी’ अन् असहिष्णुतेचे कवित्व सुरूच

By admin | Updated: November 1, 2015 00:30 IST

विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य असून, त्याची जपणूक करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी व्यक्त केली. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेच्या बळावरच

नवी दिल्ली : विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य असून, त्याची जपणूक करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी व्यक्त केली. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेच्या बळावरच भारत समृद्ध झाला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेल्या आठवड्यात अनेकदा वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध चिंता व्यक्त करणारे राष्ट्रपती येथे दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्ण जयंती समारंभात बोलत होते. आमच्या प्राचीन सभ्यतांनी गेल्या अनेक शतकांपासून या विविधतेचे जतन केले आहे. याकडे लक्ष वेधताना मुखर्जी म्हणाले की, बहुविधता ही आमची सामूहिक शक्ती असून, राज्यघटनेच्या विविध तरतुदींमधूनही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. याप्रसंगी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. काही बाबींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी राजकीय स्तरावर अत्यधिक अचूकता किंवा सतर्कता बाळगल्याने प्रगतीचा मार्ग खुंटतो. प्रगतीसाठी परस्पर आदर आणि सहिष्णुता याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. ते येथे आयआयटी दिल्लीच्या पदवीदान समारंभात बोलत होते. ते म्हणाले की, एखाद्याच्या विचाराने बौद्धिक समूहाला इजा होत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे काय, असे विचारले असता ते म्हणाले की, लगेचच बंदी घातल्यास चर्चा बंद होते. त्यामुळे एक मार्ग बंद होतो. त्वरित बंदीस माझा विरोध आहे.साहित्यिकांचे निषेधसत्र थांबेना; साहित्य अकादमी पेचातदेशातील कथित असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी विविध साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरू केल्याने साहित्य अकादमी चांगलीच पेचात आली आहे.आतापर्यंत अनेक साहित्यिकांनी आपले सन्मानचिन्ह आणि पुरस्काराची रोख रक्कम साहित्य अकादमीला परत पाठविली आहे; पण साहित्य अकादमीने अद्यापपर्यंत पुरस्कारांची रक्कम स्वीकारलेली नाही.तेलुगू साहित्यिक एम. भूपल रेड्डी यांचा २०११ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यांनी पुरस्कारापोटी मिळालेले ५० हजार रुपये रोख बँकेतच ठेवले होते. ते पैसे काढून घेतले नाहीत. त्यांनी अलीकडेच पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आणि तेवढ्याच रकमेचा धनादेश व मानचिन्ह त्यांनी साहित्य अकादमीला परत पाठविले. त्यांनी धनादेश पाठवून १५ दिवस उलटून गेले; पण त्यांच्या खात्यातील रक्कम जशीच्या तशीच आहे. साहित्य अकादमीने त्या पैशाला हात लावलेला नाही. भूपल रेड्डी यांच्याप्रमाणेच देशाच्या अनेक भागांतून साहित्य अकादमीला दररोज पार्सल येत आहेत; पण अकादमीने त्यांना हात लावलेला नाही. ते पार्सल तसेच पडून आहेत.याबाबत साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव म्हणाले की, साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार पाठविले असले तरीही आम्ही ते स्वीकारत नाही. ते फक्त आमच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. आम्ही धनादेशांनाही हात लावलेला नाही. साहित्य अकादमीचे कार्यकारी मंडळच याबाबत निर्णय घेईल.