शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीचे विवरण देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: May 23, 2017 07:06 IST

देशातल्या तमाम सनदी नोकरशहांच्या नोकऱ्या, बढत्या, बदल्या व कामकाजाचे नियंत्रण, केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभाग (डिपार्टमेंट आॅफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग ऊर्फ डीओपीटी)कडे आहे.

सुरेश भटेवरा लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातल्या तमाम सनदी नोकरशहांच्या नोकऱ्या, बढत्या, बदल्या व कामकाजाचे नियंत्रण, केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभाग (डिपार्टमेंट आॅफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग ऊर्फ डीओपीटी)कडे आहे. या विभागाने सक्त आदेश दिल्यानंतरही २0१६ साली आपल्या मालकीची स्थावर मिळकत व मालमत्ता नेमकी किती होती याचे विवरण पत्र आतापावेतो देशातल्या १८५६ आयएएस अधिकाऱ्यांनी दाखल केलेले नाही. आयएएस सेवेत असलेल्या तमाम सनदी अधिकाऱ्यांना प्रतिवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत गतवर्षाच्या स्थावर मिळकती आणि मालमत्तेचा तपशील डीओपीटीकडे विवरण पत्राद्वारे सादर करावा लागतो. असे न केल्यास पदोन्नती, एम्पॅनलमेंट इत्यादी गोष्टींपासून त्यांना वंचित ठेवण्याचा अधिकार या विभागाला आहे. डीओपीटीच्या ताज्या आकडेवारीनुसार मे महिन्याची अखेर जवळ आली तरी देशातल्या एकूण १८५६ आयएएस अधिकाऱ्यांनी अद्याप आपल्या गतवर्षाच्या स्थावर मिळकती व मालमत्तेचे विवरणपत्र दाखल केलेले नाही. उत्तर प्रदेशचे अधिकारी सर्वाधिकयात सर्वाधिक २५५ अधिकारी उत्तर प्रदेशातले आहेत, तसेच वेळेवर विवरण पत्र न भरणाऱ्या अन्य राज्यांच्या केडर अधिकाऱ्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. राजस्थान : १५३, मध्यप्रदेश : ११८, बंगाल : १0९, कर्नाटक : ८२, आंध्र प्रदेश : ८१, बिहार ७४, ओडिशा ७२, आसाम +मेघालय ७२, पंजाब ७0, महाराष्ट्र ६७, मणिपूर-त्रिपुरा ६४ व हिमाचल प्रदेश ६0 अशी आहे. याखेरीज अरुणाचल प्रदेश, केंद्रशासित प्रदेश, गोवा, मिझोराम यांच्याही बऱ्याच केडर अधिकाऱ्यांचा या यादीत समावेश आहे.