शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
4
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
5
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
6
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
7
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
8
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
9
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
10
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
11
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
12
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
13
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
14
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
15
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
16
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
17
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
18
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
19
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
20
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...

1 लाख बोगस कंपन्यांना टाळं, 3 लाख कंपन्या रडावर - पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट

By admin | Updated: July 1, 2017 20:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील "द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया"च्या कार्यक्रमात पोहोचले आहेत.

ऑनलाइन  लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 -  देशभरात जीएसटी (GST)ची अंमलबजावणी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रथमच यासंदर्भात भाषण केले. नवी दिल्लीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणताही देश मोठ्यातील मोठ्या संकटातून स्वतःला वाचवू शकतो. माझ्या आणि तुमच्या (CA) देशभक्तीत कोणतीही कमी नाही. परदेशातील काळा पैशाविरोधात केलेल्या कारवाईचा काय परिणाम होत आहे, याची माहिती स्विस बँकेतील ताज्या आकडेवारी मिळत आहे. स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 45 टक्क्यांनी कमी झाल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
 
सीए समाजाचे आर्थिक डॉक्टर
जसे डॉक्टर शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतात, तसेच चार्टर्ड अकाऊंटंट्सवर समाजातील आर्थिक स्वास्थ्याची जबाबदारी आहे. डॉक्टरांना माहिती असते की तुम्ही आजारी पडलात त्यांचं उत्पन्न वाढेल तरीही तो तुम्हाला योग्य गोष्टी खाण्यास सांगतो. आपल्या देशाची अर्थव्यवस्था योग्य, निरोगी राहावी हे चार्टर्ड अकाऊंटंट्स पाहतात.
 
जगभरात भारतीय सीएंचा डंका
सीए अर्थशास्त्राचा मोठा स्तंभ आहे. जगभरात भारतातील चार्टर्ड अकाऊंटंट्सना त्यांच्या उत्कृष्ट आर्थिक कौशल्यासाठी ओळखले जाते.  नवीन चार्टर्ड अकाऊंटन्सी करिक्युलम कोर्सचा प्रारंभ करण्याची संधी मला मिळाली. या नवीन कोर्समुळे या क्षेत्रात येणा-या लोकांचे आर्थिक कौशल्य आणखी मजबूत होण्यास मदत होईल, अशी मी अपेक्षा करतो. 
 
नोटाबंदीत चार्टर्ड अकाऊंटंट्सची दिवाळी सुट्टी झाली  रद्द 
8 नोव्हेंबर 2016 हा दिवस चार्टर्ड अकाऊंटंट्सना अधिक करुन लक्षात आहे. नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल होतं. मी असे ऐकले की 8 नोव्हेंबरनंतर चार्टर्ड अकाऊंटंट्सना जास्त काम करावं लागले. चार्टर्ड अकाऊंटंट्सना इतके काम करावे लागले की कदाचित संपूर्ण कारर्कीदीत एवढं काम करण्याची वेळ आली नसावी. मी असेही ऐकली आहे की CA दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते, मात्र सुट्टी रद्द करुन सर्व कामावर परतले. असे म्हणतात की सीएंचं ऑफिस दिवसरात्र सुरू होते. आता मला माहिती नाही परत आल्यानंतर तुम्ही (सीए) काय काम केले? योग्य की अयोग्य काम केले? देशासाठी केले की क्लायंटसाठी केले? मात्र, केले एवढं नक्की. 
 
देशात दोन पद्धतींचे स्वच्छता अभियान 
 2013 मध्ये स्विस बँकेत भारतीयांचा पैसा 42 टक्क्यांनी वाढला, आता तो 45 टक्क्यांनी कमी झालाय. परदेशात काळा पैसा जम करण्यांसाठी आणखी अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे. तुमचे (सीए) असे क्लायंट नसतील, असा मला विश्वास आहे. तुमच्यावर मला विश्वास आहे, त्यांना तुम्ही कानात सांगा. देशात मी एकीकडे स्वच्छता अभियान आणि अर्थव्यवस्थेत सफाई अभियान चालवत आहे. 
 
पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट - 3 लाखाहून अधिक नोंदणीकृत कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात 
3 लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत कंपन्यांची देवाणघेवाण चौकशीच्या फेऱ्यात आल्या आहेत. हा आकडा आणखी किती वाढेल हे सांगू शकत नाही.  जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा काही कंपन्यांची भूमिका गंभीर स्वरुपाची आढळली. एकीकडे  सरकार, व्यापारी जग, मीडिया सर्वांचे लक्ष यावर होते की 30 जूनच्या रात्री आणि 1 जुलैच्या सकाळी काय होणार. मात्र 48 तासांपूर्वीच एक लाख बोगसकंपन्यांना टाळं ठोकण्यात आले. 
 
नोटाबंदीनंतर 3 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत कंपन्यांची देवाणघेवाण चौकशीच्या घेऱ्यात आल्या आहेत. नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर येत्या काळात आणखी कठोर कारवाई करणार. तसंच  कंपन्यांवरील कारवाईचा राजकारणात तोटा, पण कुणापासून तरी सुरुवात होणं गरजेचं आहे, असंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणालेत. 
 
11 वर्षात केवळ  25 सीएंवरच कारवाई का?
गेल्या 11 वर्षात केवळ 25 सीएंविरोधात कारवाई झाली आहे. केवळ 25 जणांनी घोटाळा केला. मी असे ऐकले आहे की तुमच्याकडे 1400 हून अधिक प्रकरणं वर्षानुवर्षे अडकून पडली आहेत. एक-एक प्रकरणाचा निर्णय येण्यासाठी अनेक वर्ष लागतात. एवढ्या उच्च दर्जाच्या क्षेत्रासाठी हा चिंतेचा विषय नाही का ?, असा प्रश्नही यावेळी मोदींनी उपस्थित केला.