शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर हिमस्खलन, एका अधिकाऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: January 25, 2017 15:04 IST

जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथील लष्करी तळावर हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 25 - जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे लष्करी तळावर हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, दोन जवान बेपत्ता झाले आहेत. तर आठ जवानांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले आहे. कडाक्याची थंडी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे हिमस्खलन झाले. 
जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरपासून 80 किमी अंतरावर असलेल्या सोनमर्गमधील लष्करी तळावर ही दुर्घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेली कडाक्याची थंडी आणि हिमवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, आज सोनमर्ग येथील लष्करी तळाजवळील पर्वतांवर जमलेला बर्फ थेट या तळावर कोसळल्याने एका लष्करी अधिकाऱ्यास  प्राणांना मुकावे लागले. तसेच काही जवान बेपत्ता झाले. त्यापैकी आठ जवानांना वाचवण्यात यश मिळाले. दरम्यान, या हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचा आकडा वाढण्याची भीती लष्कराने व्यक्त केली होती. गतवर्षी सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत  मद्रास रेजिमेंटच्या दहा जवानांचा मृत्यू झाला होता. 
( हिमवर्षावात सापडलेले १० जवान शहीद - संरक्षण मंत्रालय