शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आज ऑटोरिक्षा बंद!

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

आज ऑटोरिक्षा बंद!

आज ऑटोरिक्षा बंद!
- नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघाचे आवाहन
नागपूर : ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीने कल्याणकारी मंडळाचा प्रारूप अहवाल सादर केला, मात्र यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. याशिवाय अवैध वाहतूक बंद करण्यासंदर्भात शासन उदासीन असल्याने आणि अटल पेन्शन योजना केवळ ४० वर्षांच्या ऑटोचालकापुरतीच मर्यादित असल्याने याविरोधात नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघाने बुधवारी ऑटोरिक्षा बंदचे आवाहन केले आहे.
ऑटोरिक्षाचालकाला जनतेचा सेवक असे संबांधेले जाते, परंतु शासन त्याला नागरी सेवेचा दर्जा देत नाही. पेन्शन, आरोग्य विमा योजना, मुलांच्या शिक्षणासाठी मदत आदी पोकळ आश्वासनच देत आल्याची टीका रिक्षाचालक संघटनांनी केली आहे. महासंघाचे महासचिव हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले,
राज्यातील साडेसहा लाख तर विदर्भातील ८० हजार ऑटोचालकांना केवळ आश्वासनांची पाने पुसली जात आहेत. ठोस कारवाई होत नाही. नुकतेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बैठक झाली. यात त्यांनी ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते, याशिवाय अवैध वाहतुकीवरही कारवाई करण्याची ग्वाही दिली होती, परंतु उपाययोजना नाहीच. उलट केंद्र शासनाच्या तीन योजना स्वीकारा नाही तर परवाना नूतनीकरण होणार नाही, या प्रकारचा दबाव आणला जात आहे. म्हणूनच अखिल भारतीय कामगार संघटना, संयुक्त समितीद्वारा घोषित बंदमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. या बंदला १२ विविध संघटनांनी समर्थन दिले आहे. बुधवारी नागपुरातील खासगी व व्यावसायिक असे २५ हजारावर ऑटोरिक्षा बंदमध्ये सहभागी होतील. तसेच सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
-बंदला विरोध
आदर्श ऑटोरिक्षा चालक सेवा संघाने बंदला विरोध केला आहे. संघाचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितले, हा बंद ऑटोरिक्षा चालकांच्या विरोधात आहे. काही संघटना रिक्षाचालकांना हाताशी धरून राजकारण खेळत असल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे.
बॉक्स...
- या आहेत मागण्या
: ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी योजना लागू करावी.
: अवैध वाहतूक बंद करण्यात यावी
: ऑटोरिक्षा पार्किंगची व्यवस्था व्हावी
: सहा महिन्यावर रद्द झालेल्या ऑटो परवानाचे नूतनीकरण करण्यात यावे
: ऑटोचालकांना घरे देण्यात यावी