शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

हरियाणात लागणार स्वबळाची कसोटी

By admin | Updated: October 13, 2014 02:52 IST

स्वबळावर निवडणूक लढण्याचा पूर्वेतिहास तोंडघशी पडण्याचा इतिहास असतानाही महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणातही मित्रपक्षाशी काडीमोड घेत भाजपाने राजकीय जुगार खेळला आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीस्वबळावर निवडणूक लढण्याचा पूर्वेतिहास तोंडघशी पडण्याचा इतिहास असतानाही महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणातही मित्रपक्षाशी काडीमोड घेत भाजपाने राजकीय जुगार खेळला आहे. १५ आॅक्टोबर रोजी हरियाणातील १६.३० लाख मतदार ९० आमदारांना निवडून आणण्यासाठी मतदान करतील तेव्हा या जुगाराचा फैसला होणार आहे. भाजपाने स्वबळावर पूर्ण जागांवर उमेदवार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २००४ चा अपवाद वगळता भाजपाने दिवंगत चौधरी देवीलाल, त्यांचे पुत्र ओमप्रकाश चौटाला किंवा भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिश्नोई यांच्याशी हातमिळवणी करीतच निवडणुका लढल्या. मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्याने भाजपाने हरियाणातच नव्हे तर महाराष्ट्रातही मित्र पक्षांशी काडीमोड घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचा सल्ला मानत हरियाणात स्वबळावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी भाजपचा सफाया झाला आणि या पक्षाला त्यानंतर मान वर काढता आली नाही. हा इतिहास गाठीशी असतानाही मोदींनी खेळलेला जुगार राजकीय पंडितांना धक्का देणारा आहे. यावेळी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर विधानसभा निवडणुकीत मते मागितली जात आहेत. निवडणुका जिंकल्या तर आमदारच नेता निवडणार का, हेही भाजपाने स्पष्ट केलेले नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी विकासाच्या बाजूने आहे. दिल्लीतही आमचेच सरकार असल्यामुळे या राज्याचा मोठा विकास घडवून आणू असे आश्वासन मोदी देत आहेत. मोदींच्या १८ वर रॅलींनंतर निवडणुकीत काय होणार, मुख्यमंत्री कोण असणार, हे कुणीही सांगू शकत नाही. इंडिया टीव्ही- सी व्होटर, इंडिया टुडे -सिसेरो, एबीपी न्यूज- एसी नेल्सन या तीन सर्वेक्षण संस्थांनी हरियाणात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचा अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती अवघडच आहे. हरियाणात मोदींसाठी मोठा प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे. जनाधार नसणे आणि त्या शक्तीचा प्रदेश नेता नसणे या प्रश्नांनीही अडचणीत भर घातली आहे. रामविलास शर्मा या जुन्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद असले तरी मधल्या काळात त्याचा प्रभाव ओसरल्यामुळे भाजपाला विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका जिंकणे नेहमीच अवघड ठरले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे केवळ ४ आमदार निवडून आले तर ७२ जणांना अनामतही वाचवता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. परिणामी, स्वबळावर लढण्याची सर्वात दीर्घ परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आणि स्वबळावर लढण्याचा नवा प्रयोग करू पाहणारा भाजपा यांच्यातील लढाई रंगतदार वळणावर आली आहे. ०