शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा स्वप्नील जागतिक तलवारबाजी स्पर्धेत खेळणार

By admin | Updated: June 21, 2014 00:15 IST

औरंगाबाद : औरंगाबादचा तलवारबाजीतील प्रतिभावान खेळाडू स्वप्नील तांगडे हा जागतिक तलवारबाजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. रशियातील कझान येथे १५ ते २३ जुलैदरम्यान जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी स्वप्नील तांगडे याची भारताच्या तलवारबाजी संघात निवड झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे यांनी दिली.

औरंगाबाद : औरंगाबादचा तलवारबाजीतील प्रतिभावान खेळाडू स्वप्नील तांगडे हा जागतिक तलवारबाजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. रशियातील कझान येथे १५ ते २३ जुलैदरम्यान जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी स्वप्नील तांगडे याची भारताच्या तलवारबाजी संघात निवड झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे यांनी दिली.
हैदराबाद येथे डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादचा स्वप्नील तांगडे हा खेळाडू टॉप आठमध्ये आला होता. त्याची ही कामगिरीच त्याचा भारतीय संघातील समावेश करण्यासाठी पुरेशी ठरली होती. स्वप्नील तांगडेसह नाशिकचा अजिंक्य दुधारेही रशियात होणार्‍या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेत स्वप्नील तांगडे हा फॉईल आणि अजिंक्य दुधारे हा इप्पी प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
स्वप्नील तागंडे याने आतापर्यंत १३ वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे दोन वेळेस आंतरविद्यापीठ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. स्वप्नीलने २00४ साली सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे २00७-0८ मध्ये अमरावती येथे १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा, २00८-0९ मध्ये हैदराबाद येथील ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा, २00९-२0१0 मध्ये हुस्सूर येथील ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली आहे. जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी स्वप्नील हा कसून सराव करीत आहे.

पदक जिंकणार...
भारतीय संघातील निवडीबद्दल आपण आनंदी आहोत. रशियातील स्पर्धेसाठी आपण गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात सकाळी २ आणि सायंकाळी ३ तास असे एकूण ५ तास कसून सराव करीत आहोत. या स्पर्धेतून आशिया स्पर्धेसाठीही पात्रता मिळू शकते. त्यामुळे पदक जिंकण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावणार असल्याचे स्वप्नील तांगडे याने लोकमतशी बोलताना सांगितले.