शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलचा काळाबाजार रोखण्यावर लक्ष

By admin | Updated: October 2, 2016 00:36 IST

अन्नधान्य आणि खतांची सबसिडी थेट लाभ्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांनंतर केंद्र सरकार आता रॉकेलचा काळा बाजार आणि दुरुपयोग रोखण्यावर लक्ष देणार आहे.

नवी दिल्ली : अन्नधान्य आणि खतांची सबसिडी थेट लाभ्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांनंतर केंद्र सरकार आता रॉकेलचा काळा बाजार आणि दुरुपयोग रोखण्यावर लक्ष देणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती शनिवारी दिली.एका कार्यक्रमात जेटली यांनी सांगितले की, देशाच्या काही भागात रॉकेलचा वापर इंधन म्हणून केला जातो. अनेक भागांत मात्र त्याचा दुरुपयोगच होतो. रॉकेलची मोठ्या प्रमाणात हेराफेरी होते. रॉकेलचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होतो. त्यामुळे राज्य सरकारे रॉकेल नियंत्रणमुक्त करण्यास इच्छुक आहेत. चंदीगड आणि हरियाणा ही राज्ये रॉकेलमुक्त झाली आहेत. जेटली म्हणाले की, रॉकेलचा पुरवठा तर्कसंगत बनविण्यासाठी आम्ही ठोस पावले हाती घेत आहोत. समाजाचा एक घटक आजही रॉकेलचा इंधन म्हणून वापर करीत असल्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी योग्य प्रणाली शोधावी लागणार आहे. स्वस्त धान्य दुकानांतून वितरित होणारे रॉकेल योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी २0१६-१७ या वर्षात ३९ जिल्ह्यांत थेट लाभ हस्तांरण योजना (डीबीटी) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड आदी नऊ राज्यांतील हे जिल्हे आहेत. राज्य सरकारांशी विचार विनिमय करून त्यांची निवड करण्यात आली आहे. जेटली यांनी सांगितले की, सरकार अनेक योजना डीबीटीच्या कक्षेत आणत आहे. डीबीटीचा अनुभव तपासला जात आहे. काही ठिकाणी खतांची सबसिडी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविली जात आहे. काही ठिकाणी हाच प्रयोग अन्नधान्याच्या सबसिडीवर केला जात आहे. भ्रष्टाचार थांबविणे, सबसिडीचा दुरुपयोग थांबविणे, दुहेरी सबसिडी थांबविणे आणि योग्य लाभ्यार्थ्यांपर्यंत सबसिडी पोहोचविणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)