शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अशोकस्तंभातील घटकांना अधिक जिवंत करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

---ओळींसारखेच छोटे मॅटर घ्यायचे आहे. आवश्यकतेप्रमाणे घेता येईल.

---ओळींसारखेच छोटे मॅटर घ्यायचे आहे. आवश्यकतेप्रमाणे घेता येईल.
- चित्रकार दीनानाथ पडोळे यांचे स्केच : देशाच्या प्रगतीची संकल्पना रेखाचित्रातून
नागपूर : अशोक स्तंभ सर्वांनीच पाहिलेला आहे. पण एखाद्या कलावंतांला अशोक स्तंभातूनही एखादी भन्नाट कल्पना साकारावी वाटली तर त्यातून एक विचार समोर येतो. ज्येष्ठ चित्रकार आणि माजी आ. दीनानाथ पडोळे यांनी अशोक स्तंभाचे स्केच साकारले आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांनी हे स्केच तयार केले आहे. पण आपण नेहमी पाहतो तसे हे अशोक स्तंभाचे चित्र नाही तर अशोक स्तंभात असणारे घटक वापरून त्यांनी या चित्रात अधिक जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या देशाचे प्रतीक सिंह आहेत. पडोळे यांच्या चित्रात राजा असलेला सिंह मात्र खडकावर उंच उभा आहे. एरवी अशोक स्तंभात केवळ तीन सिंह दिसतात पण यात त्यापेक्षा जास्त सिंह आहेत. घोडा हे प्रतीक त्यांनी घेतले आहे पण तो धावतो आहे. अर्थात देशाच्या प्रगतीसाठी गतीची गरज असल्याचे त्यांनी भासविले आहे. खडकावर उभे असलेले वाघ चारही दिशांवर नजर रोखून आहेत. जगाच्या तुलनेत भारत कुठेही कमी नाही कारण भारताची नजर चौफेर आहे, हा विचार त्यामागे आहे. त्यात अशोकचक्रही धावतेच आहे. बदलणाऱ्या स्थितीशी जुळवून घेत भारताची कमान अधिक उंच होण्याचा आशावाद त्यांनी यातून व्यक्त केला आहे. जनप्रतिनिधी म्हणून विधानसभा गाजवणारे दीनानाथ पडोळे आता चित्रकार म्हणून विचार करीत आहे. जनप्रतिनिधी असताना आवड जोपासण्यासाठी वेळ मिळाला नाही पण आता चित्र खुणावताहेत, असे ते म्हणाले. एका बारीक पेनने केलेले काम विलक्षण सूक्ष्म आणि रेखीव आहे.