शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांवर वैदिक संस्कृती लादण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 16, 2015 22:36 IST

शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्काराच्या माध्यमातून अन्य धर्मांवर ‘वैदिक आणि हिंदू संस्कृती’ लादण्याचा प्रयत्न होत असून त्याविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी अन्य समुदायांतील

लखनौ : शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्काराच्या माध्यमातून अन्य धर्मांवर ‘वैदिक आणि हिंदू संस्कृती’ लादण्याचा प्रयत्न होत असून त्याविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी अन्य समुदायांतील समविचारी नेते आणि धार्मिक नेत्यांचे समर्थन मागण्याचा निर्णय अ.भा. मुस्लीम वैयक्तिक कायदे मंडळाने (एआयएमपीएलबी) घेतला आहे. आज सोमवारपासून भोपाळ येथे सुरू होणाऱ्या अधिवेशनात या मोहिमेची रूपरेषा आखली जाईल.मुस्लिमांसह अन्य धर्मीय मुलांच्या मनावर हिंदू संस्कृती ठसविण्याचा प्रयत्न हा एका कटाचा भाग आहे. मुलांमध्ये हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण निर्माण करण्याचा त्यामागे डाव आहे, असे या मंडळाचे कार्यकारी सरचिटणीस मौलाना वली रहमानी यांनी म्हटले. वैदिक संस्कृती लादण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ‘दीन और दस्तूर बचाओ तहरिक’ ही मोहीम छेडली जाणार असून त्यात समविचारी हिंदू, शीख, ख्रिश्चनांसह वेगवेगळ्या धार्मिक नेत्यांना सामावून घेतले जाईल.वेगवेगळ्या धर्माच्या नेत्यांना जोडल्यास ही मोहीम यशस्वी होईल, असे आम्हाला वाटते. सोमवारी होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर खास चर्चा केली जाईल. तहरिकमध्ये कोणकोणते धर्मगुरू सहभागी होणार, याबाबत २१ आॅगस्ट रोजी कळेल. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू केले आहे, असेही रहमानी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)