केडगावमध्ये विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST
केडगाव : शिक्षकांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून केडगावमधील एका विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणार्या ऋतिक अशोक नरवडे या विद्यार्थ्याने किटकनाशक पावडर सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून या घटनेचा विद्यालयाशी संबंध नसल्याचा दावा विद्यालयाच्या शिक्षकांनी केला आहे.
केडगावमध्ये विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
केडगाव : शिक्षकांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून केडगावमधील एका विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणार्या ऋतिक अशोक नरवडे या विद्यार्थ्याने किटकनाशक पावडर सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून या घटनेचा विद्यालयाशी संबंध नसल्याचा दावा विद्यालयाच्या शिक्षकांनी केला आहे.ऋतिक हा केडगावमधील एका विद्यालयात शिकतो आहे. किटकनाशक सेवन केल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्याला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याने घटनेचा नेमका खुलासा झाला नाही. यामुळे यासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी मंगळवारी दिवसभर या घटनेची उलट-सुलट चर्चा सुरू होती. शाळेतील पोषण आहार(खिचडी) सांडल्याच्या कारणावरून ऋतिकच्या तीन शिक्षकांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे अस्वस्थ होऊन त्याने किटकनाशक पावडरचे सेवन केले. दरम्यान शिक्षकांनी मारहाण केल्यानेच ऋतिकने किटकनाशक घेतल्याचे त्याचे वडील अशोक नरवडे यांनी सांगितले. या घटनेला विद्यार्थ्यांचे शाळेबाहेर झालेल्या भांडणाचेही कारण असल्याची केडगावमध्ये चर्चा होती. (वार्ताहर)