शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात हल्ला; तीन जवान शहीद

By admin | Updated: April 28, 2017 01:50 IST

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पंझगाम येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात

श्रीनगर : काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पंझगाम येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात एका कॅप्टनसह तीन जवान शहीद, तर पाच जण जखमी झाले. लष्कराने केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन अतिरेकी ठार झाले आहेत. स्थानिकांनी जमाव जमवून दगडफेक सुरू केल्याने सुरक्षा दलांच्या कारवाईत अडथळे येत होते. त्यामुळे सुरक्षा दलांना जमावावर कारवाई करावी लागली. यात जखमी झालेल्या एका नागरिकाचा सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद्यांनी पंझगाम येथील लष्करी छावणीवर पहाटे ४ वाजता हल्ला केला. ही छावणी येथून १०० कि.मी. अंतरावर आहे. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन लष्करी जवान शहीद झाले. चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्तान घातले, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. कॅप्टन आयुष, असे शहीद अधिकाऱ्याचे नाव आहे. उर्वरित दोन जवानांची नावे समजू शकली नाहीत. या हल्ल्यात इतर पाच जवान जखमी झाले आहेत. अंद्राबी यांना अटकजम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फुटीरवादी नेत्या आसिया अंद्राबी यांना गुरुवारी अटक केली. त्यांनीच खोऱ्यातील महिलांना सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास कथितरीत्या चिथावणी दिल्याचा आरोप आहे. १९ हजार कोटी रुपये अदाकेंद्राने पंतप्रधानांच्या ८० हजार कोटी रुपयांच्या विकास पॅकेजपैकी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम जम्मू आणि काश्मीरला अदा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गृह मंत्रालयासह १५ खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पंतप्रधानांनी काश्मीरसाठी जाहीर केलेल्या विकास पॅकेजच्या प्रगतीचा घेतला आढावा. मोदींनी २०१५ मध्ये काश्मीरसाठी ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यापैकी १९ हजार कोटी रुपये केंद्राने आत्तापर्यंत राज्याला दिले आहेत.एकूण पॅकेजपैकी २५ टक्के निधी (१९ हजार कोटी रुपये) आतापर्यंत अदा झाला असून, संबंधित विकाम कामे प्रगतिपथावर आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभाग तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.