दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला
By admin | Updated: February 15, 2016 00:37 IST
नवी दिल्ली : युवकांच्या एका गटाने रविवारी नवी दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला केला. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मुख्यालयावर दगड फेकले, असा आरोप माकपने केला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाने आपण आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे.