नवी दिल्ली : युवकांच्या एका गटाने रविवारी नवी दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला केला. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मुख्यालयावर दगड फेकले, असा आरोप माकपने केला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाने आपण आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राजकारणावरून वातावरण तापले असतानाच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर या कार्यालयाचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला
By admin | Updated: February 15, 2016 03:48 IST