एटीएस... सुधारित-१
By admin | Updated: February 7, 2015 02:05 IST
एटीएसने पकडले ब्लास्टर
एटीएस... सुधारित-१
एटीएसने पकडले ब्लास्टर पांंढुरण्यात कारवाई : मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त नागपूर : महाराष्ट आणि मध्यप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथका (एटीएस) कडून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहिम आज पांढुरण्यात थांबली. पांढुरण्यातील सर्कल नंबर १० मध्ये दोन्ही राज्याचे एटीएस पथक तसेच छिंदवाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेले तरुण दहशतवादी किंवा नक्षलवादी संघटनांशी संबंधित असल्याची चर्चा आहे. मात्र, या कारवाईबाबत एटीएसचे अधिकारी स्पष्ट बोलत नसल्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. राजस्थानमधील काही व्यक्ती महाराष्ट्र- मध्यप्रदेशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात स्फोटके घेऊन असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या तरुणांचे नागपूरशीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचे कळाल्यामुळे दोन्ही राज्यातील यंत्रणा सतर्क झाल्या. मुंबई आणि पुण्यातील वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार, नागपूर एटीएसने पांढुरण्याकडे धाव घेतली. मध्यप्रदेश एटीएस तसेच छिंदवाडा पोलिसांच्या मदतीने नागपूरच्या पथकाने आज सकाळी जुन्या पांढुरण्यातील सर्कल नंबर १० मध्ये (खारी वॉर्ड) दोन तरुणांना ताब्यात घेतले. मुकेश हरिकिशन सांकला आणि राजकमल रामलाल सांकला अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही पंसल वायापूर (पो.स्टे. सदर), भिलवाडा (राजस्थान) येथील रहिवासी आहे. ज्या ठिकाणी ते दडून बसले होते. तेथे त्यांच्याकडे १५०० इलेक्ट्रीक डेटोनेटर्स, ६०० जिलेटीन कांड्या, केलवेक्स पॉवर ९०, वर्ग - २ चे विस्फोटक, एक बंडल डेटोनेटींग फ्यूज, वायर आणि इतर स्फोटके आढळल्यामुळे एटीएसचे अधिकारी चक्रावले. त्यांनी ही सर्व स्फोटके जप्त करून दोघांविरुद्ध भारतीय विस्फोटक कायद्यानुसार पांढुरणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. ---जोड आहे.