शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या आरोपींनाही अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 05:02 IST

कायदा दुरुस्तीवर सुप्रीम कोर्टाने दिले स्पष्टीकरण; अपवादात्मक परिस्थितीसाठी तरतूद

नवी दिल्ली : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती करून आरोपींना अटकपूर्व जामीन न मिळण्याची तरतूद पुन्हा समाविष्ट केली असली तरी काही अपवादात्मक परिस्थितीत उच्च न्यायालये आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ज्या फिर्यादीवरून मुळात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही अशा प्रकरणांत अन्य कोणत्याही गुन्ह्यांप्रमाणे आरोपींना दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ अन्वये अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा उच्च न्यायालयांचा अधिकार अबाधित आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. तसेच या दुरुस्तीने ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा नोंदविण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करणे सक्तीचे असले तरी अशी चौकशी फक्त फिर्यादीत सकृद्दर्शनी तथ्य आहे की नाही, याची शहानिशा करण्यापुरतीच असेल, असेही न्यायालयाने नमूदकेले.

सन २०१८ मध्ये डॉ. सुभाष काशिनाथ महाजन वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यातील गुन्ह्याची नोंदणी आणि अटकपूर्व जामीन याविषयीच्या कडक तरतुदी बऱ्याच प्रमाणात शिथिल केल्या होत्या. मूळ कायद्यात अटकपूर्व जामिनाला पूर्ण प्रतिबंध होता. मात्र, न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचे दरवाजे खुले केले. तसेच सरकारी कर्मचाºयाविरुद्ध वरिष्ठ अधिकाºयाची व इतरांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांची पूर्वसंमती घेतल्याशिवाय गुन्हा न नोंदविण्याचे बंधनही न्यायालयाने घातले.या निकालाविरुद्ध देशभर आक्रोश झाल्यानंतर सरकारने एकीकडे या निकालाच्या फेरविचारासाठी याचिका केली तर दुसरीकडे हा निकाल निष्प्रभ होईल, अशा प्रकारे कायद्यात दुरुस्ती केली.या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चौहान या वकिलाने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यातील दुरुस्तीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. न्या. अरुण मिश्रा आणि न्या. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने सर्व घटनाक्रमांचा व वेळोवेळी दिलेल्या निकालांचा संगतवार आढावा घेत ही याचिका आता केवळ ‘अ‍ॅकॅडेमिक’ स्वरूपाची ठरली असल्याचे नमूद करत ती निकाली काढली. मात्र, हे करत असतानाच न्यायालयाने संदर्भित कायदा दुरुस्तीच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे दोन मुद्यांवर स्पष्टीकरण केले.